पुण्यात राष्ट्रवादीच्या प्रतिनिधी संमेलनाला सुरुवात

0
9

पुणे- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रतिनिधी संमेलनाला पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, बालेवाडीत आजपासून सुरुवात झाली. संघटन, संघर्ष आणि सामाजिक सद्भभावनावर चर्चा करतानाच पक्षाला भविष्यातली दिशा देण्यासाठी हे संमेलन आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार उद्या सकाळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन झाले. या संमेलनाला ज्येष्ठ नेते डी. पी. त्रिपाठी, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधिमंडळ नेते अजित पवार, छगन भुजबळ यांच्यासह अन्य मान्यवर आणि पदाधिकारीही उपस्थित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धोरणे, उद्दीष्टे आणि भविष्यातील वाटचालीबाबत त्रिपाठी यांनी मार्गदर्शन केले तर आमदार दिलीप वळसे पाटील यांनी सभासद नोंदणी, पक्षातल्या निवडणुका आणि पक्षबांधणीबाबत मार्गदर्शन केले. पक्षातल्या निवडणुका आणि पक्षबांधणीबाबत संवाद साधला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं प्रतिनिधी संमेलन पुण्यातील बालेवाडीत सुरू झालं. बेळगावच्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचं उद्घाटन करून पक्षाध्यक्ष शरद पवार या संमेलनस्थळी आले. पुणे शहराध्यक्ष वंदना चव्हाण, पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष योगेश बहल आणि सहकाऱ्यांनी Sharad Pawar यांचं सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं