प्रेस क्लब कार्यालया साठी आविस कडून एल.ई.डी. टीव्ही भेट

0
13

जि. प.महिला व बाल कल्याण सभापती जयसुधा जनगाम यांच्या हस्ते भेट प्रदान*
*सिरोंचा,दि.२८*.. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्याने आज तालुक्यातील सर्व ग्रामीण व शहरी पत्रकारांनी एकत्रित येऊन येथील महसूल विभागाच्या तलाठी भवनात एक खोली भाड्याने घेऊन प्रेस क्लब कार्यालयाची उदघाटन करण्यात आला.
या प्रेस क्लब उदघाटन सोहळ्याला उदघाटक म्हणून सिरोंचाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड तर अध्यक्ष म्हणून तहसिलदार रमेश जसवंत तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून आय.बी.एन.लोकमत वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी महेश तिवारी , टीव्ही 9 वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी एम.डी. इरफान आणि प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक विलास सुपे, गडचिरोली जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समिती सभापती जयसुधा बानय्या जनगाम, वनपरिक्षेत्र अधिकारी नरखेडकर, तलाठी संघाचे अध्यक्ष गालपेल्लीवार,सिरोंचा पं. स. चे माजी उपसभापती विश्वेश्वरराव कोन्ड्रावार , एस.बी.आय.बँक चंद्रपूरचे अधिकारी होमदेव बोरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रेस कार्यालय कार्यालय उदघाटन प्रसंगी अनेक मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी प्रेस क्लब कार्यालया साठी आदिवासी विद्यार्थी संघ शाखा सिरोंचा कडून जि. प.महिला व बाल कल्याण समिती सभापती जयसुधा बानय्या जनगाम यांच्या हस्ते एल.ई.डी. टीव्ही सप्रेम भेट दिली . आणि आविसचे युवा सामाजिक कार्यकर्ता किरणकुमार वेमुला यांनी घड्याळ भेट दिले.
प्रेस क्लब कार्यालयासाठी सप्रेम भेट पत्रकारांना प्रदान करतांना आविसचे तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम, सिरोंचाचे माजी उपसरपंच रवी सल्लमवार,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सतीश गंजीवार, उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक व पेंटीपाका ग्रा.प.उपसरपंच कुम्मरी सडवली, रवी बोन्गोनी, किरणकुमार वेमुला, श्याम बेज्जनींवार, आदी उपस्थित होते.
प्रेस क्लब कार्यालय उदघाटन सोहळ्याला गावातील सर्व प्रतिष्टीत नागरिक, सर्व राजकीय पक्षाचे पुढारी आणि प्रेस क्लब चे सर्व पदाधिकारी व प्रतिनिधी , इलेक्ट्रॉनिक मीडिया व विविध पोर्टेल न्यूस चे प्रतिनिधी उपस्थित होते.
या कार्यक्रमाची प्रास्ताविक पत्रकार मधुसूदन आरवेल्ली तर उपस्थितांचे आभार पत्रकार अशोक दुर्गम यांनी मानले.