जि.प.सभापतीच्या हस्ते पल्स पोलिओ लसीकरण

0
11

*सिरोंचा,दि.२८*.. राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियानांतर्गत आज सिरोंचा शहरातील प्रभाग क्रमांक 8 मधील अंगणवाडी केंद्रात 0 ते 5 वयोगटातील बालकांना पल्स पोलिओ लसीकरणाची शुभारंभ गडचिरोली जिल्हा परिषदेचे महिला व बाल कल्याण समिती सभापती जयसुधा बानय्या जनगाम यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी जि. प.महिला व बाल कल्याण समिती
जयसुधा बानय्या जनगाम यांच्या हस्ते 0 ते 5 वर्षाखालील बालकांना पल्स पोलिओचे लसीकरण डोस पाजण्यात आले.
या पल्स पोलिओ लसीकरण शुभारंभला परिचारिका, अंगणवाडी केंद्राचे सेविका , मदतनीस उपस्थित होते.