प्रकरण न्यायप्रविष्ठ असतांना वृक्षतोड

0
9
         गोंदिया,दि.२८~ गैरकायदेशीर शेती करण्याचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना आरोपींनी फिर्यादीच्या शेतातील झाडे तोडून धुºयावरील माती खोदकाम केल्याची घटना तुमखेडा खुर्द येथे घडली. याप्रकरणी फिर्यादी अशोककुमार चन्ने यांनी आरोपींवर गुन्हा दाखल करुन कारवाईची मागणी केली आहे.
श्री चन्ने यांनी वनक्षेत्र अधिकाºयांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, तुमखेडा खूर्द येथे गट क्र. २२ जागेवर त्यांची ०.०८ हे.आर. शेतजमीन आहे. या जागेवर आरोपी सदाशिव नंदेश्वर व बालू नंदेश्वर हे पितापूत्र बेकायदेशीररित्या शेती करीत होते. यावर आक्षेप घेतला असता आरोपी हे त्यांना शिवीगाळ करायचे. त्यामुळे या प्रकरणी गोंदिया कनिष्ठस्तर दिवानी न्यायालयात याचिका दाखल केली. यावर न्यायालयाने ४ एप्रिल २०१४ रोजी आरोपींना सदर जागेवर शेती करण्यास व जागेवर येण्याचे मनाई आदेश दिले.
न्यायालयाच्या या आदेशानंतर आरोपींनी सदर प्रकरणी जिल्हा न्यायालयाकडे अपिल केले असून हे प्रकरण न्यायनिवाड्याकरीता प्रलंबित आहे.
असे असताना, आरोपींनी बेकायदेशीररित्या शेतातील दोन झाडे तोडले. तसेच शेतीला लागून असलेले धुरे पाडून एक ट्रकपेक्षा जास्त माती घेवून गेले. या बाबीची तक्रार गोंदिया ग्रामीण पोलीस, पोलीस पाटील व तंटामुक्त समितीला देखील केली.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना ताकीद दिली असली तरी वनविभागाच्या अधिकाºयांनी मोका शेतजमिनीच्या जागेवर येवून चौकशी करावी व आरोपींवर गुन्हा दाखल करावा