सात दिवसाचे आत प्रस्ताव सादर करा – ना.मुनगंटीवार 

0
12
सावली,दि.03ः तालुक्यातील निमगाव पाणलोट अंतर्गत येणा-या विरखल चक शिवारातील सर्व्हे नम. 21 मधील कोकलपार तलावात गोसीखुर्द धरणाचे पाणी नविन पाईपलाईन टाकुन पाणी सोडण्याच्या मागणीचे निवेदन भारतीय जनता युवा मोर्चाचे चंद्रपुर जिल्हा उपाध्यक्ष पूनम झाडे यांच्या नेतृत्वात निमगाव येथील शिष्टमंडळाने राज्याचे वित्त, नियोजन व वनमंञी तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना दिले.निवेदनात या तलावाखाली येणारी शेती दरवर्षी पाण्याअभावी ओसाड राहत असल्याने येथील शेतक-यांना सतत नापीकीचा सामना करावा लागत असल्याचे मंञी महोदयाच्या निर्दशनास आणुन दिल्यानंतर ना. मुनगंटीवार यांनी गोसीखुर्द विभागाचे मुख्य अभियंता शेख यांच्याशी संपर्क भ्रमणध्वनीद्वारे साधून सात दिवसाचे आत प्रस्ताव तयार करुन वनविभागाडे मंजुरीसाठी पाठविण्याचे निर्देश दिले.मुख्य अभियंता शेख यांनी प्रस्ताव सादर करण्याचे आश्वासन दिले.शिष्टमंडळात डॉ. ठाकुर, सुरेश करकाडे, बंडु ठाकरे, भाष्कर जुनघरे, विनायक खोब्रागडे व बंडू सातपैसे आदी उपस्थित होते.