मुख्य जलवाहिणी फूटल्याने तुमसरात रस्त्यालगत बनले तलाव

0
9

*लाखों लिटर पीण्याच्या पाण्याचा अपव्यय*

तुमसर,दि.06 :- तुमसर शहराला पाणी पुरवठा करणारी देव्हाडी मार्गावरील मुख्य जलवाहीनी फुटुन रोडाच्या कडेला तलाव तयार झाल्याचे चित्र समोर आले आहे .तुमसर शहराला माडगी येथील वैनगंगेच्या पात्रातुन पाणी पुरवठा करणारी ही मुख्य जलवाहीनी आहे. देव्हाडी मार्गावर फादर एॅग्णल शाळेपासुन ते बांगळकर यांच्या घरापर्यंत ही जलवाहीनी फुटुन लाखो लिटर पाणी वाहुन जात असल्याचे समोर आले आहे. त्या रस्त्यादरम्यान तब्बल ३०० मीटरच्या मार्गावर रोडाच्या डाव्या कडेला पाणी साचुन तलाव तयार झालेले दिसुन आले आहे. नुकताच न.प तुमसरच्या  शतकोत्तर सवर्ण महोत्सवाचे कार्यक्रम संपन्न झालेले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या प्रमुख उपस्थितीत महोत्सवाचे समारोप करण्यात आलेले होते. ऐकीकडे मुख्यमंत्री यांचे शहराला मुबलक पाणी पुरवठ्याचे ध्येय व दुसरीकडे शहराला पुरवठा करणारी मुख्य जलवाहीनी फुटलेली यावर न.प. प्रशासनच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उभा राहीला आहे.
देव्हाडी मार्गावरील फुटलेल्या त्या जलवाहीनीच्या पाण्याचा उपयोग तेथील शेतकरी शेतीकरीता व शाळेच्या आवारातील बागेला पाणी पुरवठा करण्याकरीता करत आहेत. फुटलेल्या त्या जलवाहीनीतुन अशुद्ध पाणी पुरवठा नागरीकांना केला जात आहे.येथे नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थीत होत आहे. पाणीपुरवठयाकरीता नवीन जलवाहिन्या नविनीकरणाच्या कामाला मुख्यमंत्री यांनी  ७० कोटी रुपयांचा निधी मंजुर केला. परंतु त्याची वाट पाहत बसणे कितपत याेग्य आहे असा प्रश्न नागरीकांकडुन केला जात आहे.ती जलवाहिनी मागील कित्येक वर्षांपासुन नादुरुस्त असुन पाणीच्या पाण्याचा सर्रास अपव्यय होतांना दिसुन येत आहे.तोंडावर आलेला उन्हाळा व त्यात नित्या लाखो लिटर पाणी वाया जेणे यामुळे नागरीकांना जलसंकटाला तोंड देण्याची स्थिती आहे.वैनगंगेचे पात्र कोरडे ,फटलेल्या जलवाहीन्या,शहरातील निन्य नागरीक पाण्याविना  त्यात वाहुन जात असलेल्या लाखो लिटर पाण्याला जबाबदार कोण असा प्रश्न येथे समाज सेवकांकडुन उपस्थित केला जात आहे.सदर बाबतीत नगर पालीकेच्या मुख्याधीकारी अर्चना मेंढे यांना विचारणा केली असता त्यांनी सुट्टीवर असल्याचे सांगून बोलन्यास नकार दिला. अशा परिस्थितीमध्ये नगर परीषद तुमसर महोत्सवाच्या आनंदतात गुंग होऊन कर्तव्यास विसरल्याचे दिसून येत आहे.
शहरातील जनतेला फटलेल्या याच जलवाहीणीमुळे मुबलक पाणी पुरवठा केला जात नाही व मिळते ते पाणी पीण्यास योग्य नाही ,अशा परीस्थीतीत तुमसरच्या विकासकामांना कोणती गती व दिशा देण्यात आली असा आरोप सामाजिक  कार्यकर्ता कमलाकर निखाडे यांनी केला आहे.नागरीकांकडून त्या फुटलेल्या जलवाहीनीच्या दुरुस्तीचे काम त्वरीत करण्याची मागणी केली जात आहे.