मार्निंगवाॅकला गेलेल्या 22 जणांना कुत्र्याना घेतला चावा

0
5

लाखांदूर,दि.06 ः- तालुक्यातील पालांदूर येथील महिला पुरुष हे नेहमीप्रमाणे सकाळी 6 वाजेच्या सुमासार मॉर्निगवाक करण्याकरिता जात असतांनाच गावातून पळत आलेल्या पिसाळलेल्या एका कुत्र्याने तब्बल २२ लोकांचा चावा घेतल्याने त्यांना रुग्णालयात हलविण्याची घटना घडली. 13 जखमीवर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात तर 9 लोंकावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत.कुत्र्याला पकडण्याचा प्रयत्न करण्यात आले असता तो पळून गेल्याने भंडारा नगरपरिषदेच्या पशुसंर्वधन विभागाला पिसाळलेल्या कुत्राल्या पकडण्याची जबाबदारी पालांदूर ग्रामपंचायतीने सोपवली आहे.पिसाळलेल्या कुत्र्याला लवकरात लवकर पकडून जेर बंद करावी अशी मागणी नागरीकांनी केली  असून पालांदूर गावात कुत्र्याची दहशत पसरली आहे