संत साहित्य संमेलनात दिंडीचे स्पर्धेचे आयोजन

0
9
गोंदिया,दि.06- वारकरी साहित्य परिषद व डॉ.बाबासाहेब आंबेडक समता प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने ७ वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन १५ फेब््राुवारीपासून अर्जुनी मोरगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. तेव्हा या साहित्य संमेलनात भव्य दिंडी स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे.
 ज्यांना दिंडीमध्ये सहभागी व्हायचे आहे. त्यांनी दिंडीतील सर्व पुरूष पांढºया पोशाखात असणे आवश्यक आहे. टाळ,मृदंग,वीणी व इतर साहित्य सोबत आणावे, प्रत्येक दिंडीमध्ये किमान ३० वारकरी किंवा त्यापेक्षा जास्त असावे. दिंडी स्पर्धेत ड्रेसकोड,शिस्त,रचना,सांप्रदायिक चाल,संतांचे अभंग,स्वर,ताल, पावली,ठेका या बाबींचा विचार करूनच बक्षीकांचे मानकरी ठरणार आहेत. स्पर्धेत शिस्तपालन करण्यासाठी चोपदार व शिपाई दिंडी मंडळाने सोबत आणावे लागतील. दिंडी स्पर्धेत प्रथम पुरस्कार ३१ हजार,व्दितीय पुरस्कार २१ हजार,तृतीय ११ हजार, उत्तेजनार्थ ५ हजार रूपयांचे पुरस्कार ठेवण्यात आले आहे. तेव्हा आयोजित दिंडी स्पर्धेत वारकºयांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संमेलनाचे स्वागताध्यक्ष पालकमंत्री ना. राजकुमार बडोले व वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी केले आहे.