खैरे-कुणबी समाजातर्फे येलेकर दाम्पत्यांचा सत्कार

0
23

गडचिरोली,दि,07 – खैरे-कुणबी स्रेह व सांस्कृतिक मंडळ चंद्रपूरच्यावतीने दरवर्षी वधू-वर परिचय मेळाव्याचे औचित्य साधून विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाºया समाज बांधवांचा सत्कार करण्यात येतो.  यावर्षीसुध्दा वूध-वर परिचय मेळाव्याचे औचित्य साधून आयोजित सत्कार समारंभात अष्टपैलू व्यक्तीमत्व म्हणून ओळखल्या जाणाºया प्रा. संध्या शेषराव येलेकर व प्रा. शेषराव येलेकर या दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला.

प्रा. संध्या शेषराव येलेकर या गोंडवाना विद्यापीठात सिनेट सदस्य म्हणून निवडून आल्यात. त्या नागपूर विद्यापीठाच्या हॉकीच्या कलर होल्डर असून गोंडवाना विद्यापीठाच्या एम. ए. इंग्रजी विषयाच्या सुवर्णपदकाच्या मानकरी आहेत. शिवाय त्या महाराष्टÑ अनिसं व जिजाऊ ब्रिगेडच्या सक्रीय कार्यकर्त्या आहेत. सोबत त्यांचे सहचारी प्रा. शेषराव येलेकर हेसुध्दा ओबीसींच्या व शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सतत प्रयत्नशिल असतात. ते राष्टÑीय ओबीसी महासंघ व डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे पदाधिकारी आहेत.
या दोघांच्याही कार्याचा समाजाच्यावतीने गौरव व्हावा म्हणून कार्यक्रमाचे उद्घाटक माजी आ. सुभाष धोटे, समाज मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय देवतळे यांच्या हस्ते व जि.प. उपाध्यक्ष अ‍ॅड. दिगंबर गुरपुडे, इजि. तिवाडे, जि.प. सदस्या डॉ. आसावरी देवतळे, प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य धनंजय चापले, गुणेकर आरीकर, जे. डी. पोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन येलेकर दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी समाजबांधव, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यापूर्वीसुध्दा त्यांना चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील विविध सामाजिक व शैक्षणिक संघटनांनी सन्मानित केले आहे.