विदर्भात मेघ गर्जनेसह अवकाळी पाऊस

0
17

गोंदिया,दि.११ः~गेल्या चार ते पाच दिवसांपासून कर्नाटक, अरबी समुद्र ते मालदीव या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचा परिणाम राज्यातील तापमानावर झाला असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील बहुतांशी भागांत मेघगर्जनेस गारपीट होण्याचा हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला
आज सकाळी व दुपारी १ वाजून ४५मिनिटे च्या दरम्यान गोंदिया शहरासह विदर्भातील भंडारा,वाशिम,अकोलासह यवतमाळ जिल्ह्यात गारपिट व मेघगर्जनेसह जोरदार पाऊस कोसळला.गोंदिया शहरातील जयस्तंभ चौकात होर्डींग कोसळल्याने पानठेल्याचे नुकसान झाले.न्यायालय परिसर,जिल्हाधिकारे यांचे जुने निवासस्थान परिसरात झाडे कोसळली.तिरोड्यात एका समारंभाचे मंडपच कोसळले.या पावसामूळे आंब्याचा बहराचे मोठे नुकसान झाले आहे.तूर,उडीदपिकाचेही नुकसान झाले आहे. अकोला जिल्ह्यातील आकोट व तेल्हारा तालुक्यातील काही गावांमध्ये गारांचा पाऊस सकाळी पडला.बुलडाणा जिल्ह्यातही गारांचा पाऊस पडला.शेतातील पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

गेले दोन दिवस आकाश निरभ्र होते. येत्या मंगळवारपर्यंत (ता. १३) राज्यात ढगाळ हवामान राहणार असून, रविवारी (ता. ११) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने वर्तवली होती
रविवारी,सोमवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पाऊस पडेल, तर विदर्भात गारांचा पाऊस पडेल. त्या अंदाजानुसार जिल्ह्यांत आकोट,तेल्हारा,यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या गारांचा पाऊस पडला असल्याने रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली आहेत.