जिल्हास्तरीय ‘गोंडवाना महोत्सवा’चे आयोजन

0
23

गडचिरोली,दि.11-कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा गडचिरोलीद्वारा आयोजित महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियनांतर्गत महिला स्वयंयहाय्यता गट, वैयक्तिक स्वरोजगारींनी केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री आणि गोंडवाना महोत्सव -२0१८ आयोजन १५ ते १९ फेब्रुवारी या कालावधील चंद्रपूर मार्गावरील कृषी महाविद्यालयाचे प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाद्वारे आयोजित महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत गोंडवान महोत्सव – २0१८ मध्ये जिल्हा भरातील ग्रामीण कारागिर आणि महिला उद्योजकांनी बनविलेल्या आकर्षक लाकडी कलाकृती, बॅग्ज, अंबाडीचे शरबर, डिंग, लाडू, आसल जांभूळघाट, मिरची, जाय, अस्सल हळद पावडर, आयुर्वेदिक औषधी, हातसडीचे तांदूळ, धातूच्या मूर्ती आदी वस्तूंची विक्री करण्यात येणार आहे. तसेच या महोत्सवात महिला बचतगटांनी तयार केलेल्या मच्छी चकल्या, मासोटीचे लोणचे, पुरणपोळी, बंगाली मिठाई, चकल्या कुरड्या आदी वस्तूंचा अस्सल पाहूणार मिळणार आहे. या महोत्सवादरम्यान दररोज सायंकाळी सास्कृतिक कार्यक्रमाची अनोखी मेजवाणी मिळणार आहे.
तसेच जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी, उत्कृष्ट अधिकारी, कर्मचार्‍यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
या महोत्सवामध्ये जिल्हा भरातील बचतगटांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तसेच जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानच्या वतीने करण्यात आले आहे.