पोवार समाजाने इतर समाजाचे नेतृत्व करण्याजोगे सक्षम व्हावे-डॉ. बोपचे

0
14

गोेरेगाव,दि.१३: पोवार समाज हे चक्रवती राजाभोज यांचे वंशज आहेत हे भूषणावह आहे. मात्र आजघडीला अनेक समाजबांधव हे हलाखीच जीवन जगत आहेत.. त्यांच्या मुलांना नोकरीची वाणवा आहे. त्याकरिता आता आपल्या पोवार समाजाने आपल्या हक्कासाठी पेटून उठावे व ओबीसी आंदोलनात सक्रिय सहभागी होवून इतर समाजाचे नेतृत्व करण्याजोगे सक्षम व्हावे, असे प्रतिपादन पोवार समाजाचे नेते व अखिल भारतीय ओबीसी महासभा समन्वयक माजी खा.डॉ. खुशाल बोपचे यांनी केले.
गणखैरा येथे पोवार समाजाच्यावतीने १० फेबु्रवारी रोज क्षत्रिय सम्राट राजाभोज यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थावरुन बोलत होते. याप्रसंगी उद्घाटक म्हणून ओबीसी कृती समिती जिल्हाध्यक्ष बबलू कटरे, तर समास समाज प्रवक्ते व मार्गदर्शक म्हणून पोवार प्रगतीशील मंचचे सचिव प्रा.संजीव रहांगडाले, भागचंद रहांगडाले, लिलेश्वर रहांगडाले उपस्थित होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी सरपंच खुन्नीलाल पारधी, उपसरपंच लिखन पाधरी, धनराज पटले, भुमेश्वर परधी, देवीलाल गौतम, राजेंद्र रहांगडाले, चुन्नीलाल पारधी, भाऊलाल रहांगडाले, डुमेश्वर पारधी आदी उपस्थित होते.
सुरुवातीला चक्रवती सम्राट राजाभोज यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करुन विधीवत पूजा करण्यात आली.यावेळी ओबीसी कृती समिती जिल्हाध्यक्ष बबलू कटरे यांनी पोवार समाजाची आजची स्थिती व उद्याचे भविष्य यावर सविस्तर मार्गदर्शन केले. पोवार समााजाला बळकट करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. भागचंद रहांगडाले ायंनी पोवार समाजाने आपल्या हक्कासाठी एकजूट होवून शासनावर दबावतंत्राचा वापर करुन आपल्या भागण्या मान्य करवून घेण्याचे आवाहन केले. तसेच समाजातील युवकांनी एमपीएससी व युपीएसारख्या स्पर्धात्मक परीक्षांना तोंड देवून समाजाचे प्रतिनिधीत्व करण्याचे आवाहन केले. प्रा.संजीव रहांगडाले यांनी पोवार प्रगतीृील मंचाने राबविलेल्या उपक्रमाबाबत माहिती देत सविस्तर मार्गदर्शन केले. लिलेश्वर रहांगडाले यांनी प्रत्येक गावात राजाभोज जयंती साजरी करण्यात येवून समाजातील विविध ज्वलंत प्रश्नांवर चर्चा घडवून आणण्याचे आवाहन केले. यावेळी उपसरपंच लिखन पारधी यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन सतील पारधी यांनी तर आभार टोलीराम पारधी यांनी मानले. कार्यक्रमानिमित्त राजाभोज यांच्या जयंती निमित्त गावात रॅली काढण्यात आली होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रितम पारधी, सतीश, यशवंत पारधी, देवीलाल गŸौतम, ईश्वर बिसेन, संजय पटले, राजेंद्र रहांगडाले, चतुर बघेले, गिरीश पटले, मनिष पटले, देवेंद्र पारधी, गोqवद पारधी, हेतराम ठाकरे, कैलास पारधी, माणिक गौतम यांच्यासह समाजबांधवांनी सहकार्य केले.