महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये लागणार ७ जनरल डबे

0
18

शिशुपाल पटले यांनी घेतली नागपुरात डिआरएमची भेट
भंडारा,दि.14: गोंदिया रेल्वे स्थानकातुन सुटणार्‍या महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये गोंदिया ते नागपुर ७ जनरल डबे लावण्याचे आश्वासन डीआरएम गुप्ता यांनी आज माजी खा. शिशुपाल पटले यांना दिले. या मागणीचे निवेदन प्रवाशी संघटनेने शिशुपाल पटले यांना दोन दिवसापुर्वी दिले होते. सोबतच महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये कायमस्वरुपी दुध वाहतुकीसाठी स्वतंत्र डबा देण्यात आला असुन त्या डब्यावर दुध वाहतुकीसाठी डबा असा फलक लावण्यात येणार असल्याचे डिआरएम गुप्ता यांनी सांगीतले.
गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील असंख्य गोरगरीब प्रवाशी महाराष्ट्र एक्सप्रेसने दररोज गोंदिया ते नागपुर असा प्रवाश करीत असतात. मात्र, एकच जनरल डबा असल्यामुळे प्रवाशांना अनेकदा अपमानास्पद वागणुक सहन करावी लागते. जनरलचे डबे अपुरे पडत असल्याने पासधारक तसेच गरिब प्रवाशी कुठल्याही डब्यात जाऊन बसतात. त्यामुळे अनेकदा पोलीसांचे दंडुके खावे लागते तसेच अधिकार्‍यांच्या दंडात्मक कारवाईलाही पुढे जावे लागते. धावपळीत अनेकदा लहान-मोठे अपघात सुद्धा घडतात. काही दिवसापुवीa एका प्रवाशाला आपला जिवही गमवावा लागला. तसेच या एक्सप्रेसमध्ये असलेले स्लिपर कोच डब्यात नाममात्र प्रवाशी प्रवास करतात. अनेकदा हे डबे खाली असतात. स्लिपर कोचचे ३ डबे जनरल डबे म्हणुन वापरण्यात यावे, असे रेल्वे बोर्डाचे आदेश होते परंतु, आदेशाची अंमलबजावणी होत नव्हती. गोंदिया ते नागपुर या प्रवासात गोरगरीब प्रवाशांना सन्मानाने प्रवाश करता यावा, याकरीता प्रवाशी संघटनेतर्पेâ डबे वाढविण्याच्या मागणीचे निवेदन शिशुपाल पटले यांना दोन दिवसापुवीa दिले होते. या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन माजी खा. शिशुपाल पटले यांनी आज डिआरएम गुप्ता यांची भेट घेतली. दुध वाहतुकीसाठी असलेल्या डब्यावर खडुने लिहीले जात होते. त्या डब्यावर दुध वाहतुकीसाठी डबा असे नामफलक लावण्यात यावे आणि जनरलचे ७ डबे लावण्यात यावे, तसेच तुमसर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्मवर जाण्यासाठी एकच पुल असल्याने गोरगरीब प्रवाशांना आपले सामान घेऊन जातांना त्रास सहन करावा लागतो, त्यामुळे तुमसर प्लॅटफार्मवर जाण्यासाठी आणखी एका पुलाची निर्मीती करण्यात यावी, यावर पटले यांनी डिआरएम गुप्ता यांच्याशी चर्चा केली. यावर स्लिपर कोचच्या पाच डब्यांवर गोंदिया ते नागपुर व नागपुर ते गोंदिया जनरल असे नामफलक लावण्यात येतील, यामुळे गोंदिया ते नागपुर तसेच नागपुर ते गोंदिया या दरम्यान प्रवाश करणार्‍यांना प्रवाशांना जनरलच्या तिकिटावर स्लिपर कोचमधुन प्रवाश करता येईल ही सुविधा गरीब व पासधारक प्रवाशांसाठी पुढील आठवड्यापासुन सुरु करण्यात येईल, असे आश्वासन डिआरएम गुप्ता यांनी शिशुपाल पटले यांना दिले. दुध उत्पादक शेतकरी व जनरल डब्यांमधुन प्रवास करणारे प्रवाशी यांनी शिशुपाल पटले यांचे अभिनंदन केले आहे.