दीपक कुमार मीना वाशिम जिल्हा परिषदेचे नवीन सीईओ

0
15

वाशिम,दि.14 – वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांची महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघाचे (महानंद) व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली झाली असून, त्यांचे जागेवर दीपक कुमार मीना हे नवीन सीईओ म्हणून येणार आहेत. १४ फेब्रुवारीला गणेश पाटील व दीपक कुमार मीना यांच्या बदलीचे आदेश निघाले. मीना हे यापूर्वी महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघाचे (महानंद) व्यवस्थापकीय संचालक म्हणून रूजू होते तर आता पाटील हे महानंदचे व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.

आयएएस दर्जाचे असलेले गणेश पाटील यांनी जून २०१५ मध्ये वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सूत्रे स्विकारली होती. पावणे तीन वर्षाच्या कालावधीत त्यांनी जिल्हा परिषदेच्या कामकाजात गतिमानता, पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला. सोबतच कर्मचाºयांच्या बदली प्रक्रियेला समुपदेशनाची जोडही दिली. ‘झिरो पेंडन्सी व डेली डिस्पोजल’ या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील विभागप्रमुख व उपविभाग अधिका-यांच्या कॅबिनचा अपवाद वगळता अन्य अधिकारी व कर्मचा-यांच्या कॅबिन हटवून कॅबिनमुक्त कार्यालय हा उपक्रमही राबविला. विधिमंडळाच्या पंचायत राज समितीचा जानेवारी महिन्यातील दौरा आटोपल्यानंतर पाटील यांना बदलीचे वेध लागले होते.