नेहरु मैदान शाळेला भीषण आग

0
8

-लाखोंची संपत्ती जळून राख
-महत्वाचे दस्तावेजही आगीच्या भक्षस्थानी

अमरावती,दि.१४ : शहरातील मध्यवर्ती नेहरु मैदानावर असलेल्या अमरावती महापालिकेच्या लाल शाळेला आज सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. काही क्षणातच आगीने भीषण रुप धारण करुन संपूर्ण शाळेच्या इमारतीलाच आपल्या कवेत घेतले. अग्रीशमन दल युद्धस्तरावर आग विझविण्याचा प्रयत्न करीत आहे. पण आगींच्या ज्वाळा वाढतच जात असल्याने आग विझविण्यात अनेक अडचणी येत आहेत. शाळेच्या इमारतीच्या बांधकामात जून्या लाकडाचा वापर असल्याने आगीने क्षणार्धात भीषण रुप धारण केल्याचे बोलले जात आहे. या आगीत लक्षावधी रुपयांच्या संपत्तीसह महापालिकेच्या अनेक दस्तावेजांची जळून राखरांगोळी झाली.