वैनगंगा नदीपात्रात इसमाचा मृतदेह आढळला

0
9

गडचिरोली,दि. १६ – मार्कंडादेव येथे श्री क्षेत्र मार्कंडेश्वराची यात्रा सुरू आहे. अनेक गावातून भाविकभक्त दर्शनासाठी याठिकाणी येत असता. वैनगंगा नदीमध्ये स्रान करून दर्शन घेत असतात.आज १६ फेब्रुवारी रोजी वैनगंगा नदीपात्रात चंद्रपूर जिल्ह्याच्या हद्दीत एका इसमाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना नागरिकांना दिसला. तो मृतदेह बोटीच्या सहाय्याने काढून त्याची ओळख करण्यात आली. नातेवाईक शरद ढूमाजी खेवले यांनी गणेश माधव खेवले (३५) रा. विसापूर ता. जि.  गडचिरोली असे इसमाचे नाव असल्याचे सांगितले.
प्राप्त माहितीनुसार महाशिवरात्रीसाठी गणेश खेवले हा कुटुंबासोबत १४ फेब्रुवारीला आला होता. कुटुंब गावास परत गेले. परंतु मृतक हा कुटुंबासह गावाला परत गेला नाही. त्यामुळे कुटुंबियांनी १४ ते १६ फेब्रुवारीपर्यंत त्याचा शोध घेतला. मात्र आज बोटचालक गणेश गेडाम यांचा मित्र नागेश गेडाम यांनी सदर प्रेत पाण्यात तरंगत असल्याचे सांगितले. त्यानंतर बोट चालक गणेश गेडाम यांनी प्रेत पाण्याबाहेर काढले.
पंचनामा करून मृतदेह चंद्रपूर जिल्ह्यात हद्दीत येत असल्याने सावली येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. मृत्यूचे कारण कळू शकले नाही. स्थळाची व मृतकाचा पंचनामा सावली पोलिसांनी केला. त्या मृताची पंचनामा करताना चामोर्शीचे तहसीलदार अरूण येरचे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे, पोलिस निरीक्षक गोरख गायकवाड व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.