शेतकर्यांची नव्हे तर श्रीमंताची सरकार- मनोहर चंद्रिकापुरे

0
19

अर्जुनी मोरगाव,दि.17(संतोष रोकडे)ः- अर्जुनी मोरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने शेतकरी,शेतमजूराच्या मागण्यांना घेऊन तालुक्यातील तिरखुरी येथून बिरसामुंडा मंदिरातून शेतकरी दिंडीला सुरवात करण्यात आली आहे.सदर दिंडी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी व किसान सभा अध्यक्ष मनोहर चंद्रिकापुरे यांच्या नेतृत्वात काढण्यात आली आहे.चंद्रिकापूरे यांनी ही शेतकरी दिंडी शेतकरी शेतमजूर सर्वसामान्य न्याय देण्यासाठी काढण्यात आल्याचे सांगत सध्याचे सरकार हे शेतकर्यांचे सरकार नसून श्रीमतांचे सरकार असल्याची टिका केली. या शेतकरी दिंडीमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे,तालुका अध्यक्ष लोकपाल गहाणे योगेश नाकाडे युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अर्जुनी मोरगाव, गोर्वधन ताराम,अमन पालीवाल, अनिल गावळे ग्रा.प.सदस्य, प्रिया जांभुळकर सरपंच, विजय कुंभरे,हिरासींग मडावी,मधुकर नरेटी,रमेश सलामे चंद्रशहा मडावी, रमेश कोल्हे,बालु ताराम,किशोर राउत, श्यामराव धुर्वे,देवीदास कोरेटी, परिसरातील सरपंच,उपसरपंच व ग्रा.प. सदस्य सहभागी झाले होते.

चंद्रिकापुरे यांनी शेतकरांची मोठ्या प्रमाणात शेतकर्यांची लुबाडणूक केली जात असुन जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळाला नसल्याचे सांगत सर्व कर्ज सरसकट माफ करण्याची मागणी केली. सातबारा कोरा करा शेतकरांना उत्पादन खर्चाच्या दिड भाव देणे.500 रुपये प्रती क्विंटलप्रमाने बोनस जाहीर करण्याची मागणी केली.दिंड़ीने शुक्रवारला केशोरी जि.प.क्षेत्रातील तिरखुरी,भरनोली,बनीटोला,बोरटोला,शिवराम टोला,कन्हाळगाव,राजोली, खडकी,खडकीटोला,सायगाव,तुकुम,नविन टोला,जांभळी, गावात भ्रमण केले.