ट्रॅक्टर चालक-मालक संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

0
24

देवरी,दि.17ः- राज्य शासनाने १२ जानेवारी २0१८ काढलेल्या जी.आर.चा निषेध करून सदर जी.आर. रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन देवरी तालुका ट्रॅक्टर चालक-मालक संघटनेने तहसीलदारांना दिले.निवेदनात म्हटले आहे, महाराष्ट्र शासनाचा १२ जानेवारी २0१८ चा जी.आर. रद्द करा, गौण खनिज प्रतीबंध समिती रद्द करावी, देवरी तालुक्यातील रेतीघाट त्वरीत लिलाव करण्यात यावे, शहरी भागातील दंड व ग्रामीण भागातील दंड असे वर्गीकरण करुन दंड आकारण्यात यावे, तालुकास्तरीय ग्रामीण बाजार भाव मूल्यानुसार दंड आकारण्यात यावे, गावकर्‍यांच्या घर बांधनीसाठी २ ब्रासच्या ठिकाणी २0 ब्रास रेती काढण्यासाठी मुभा व शेतीतील विहिर बांधकामासाठी १0 ब्रास रेती काढण्याची मुभा द्यावी, रेती, गिट्टी, बोल्डर, मुरुम, विटा आदी साहित्य वाहतूक करण्यासाठी वाहतूक परवाना कमर्सीयल (धंदा) ट्रॅॅक्टर असावा ही अट रद्द करण्यात यावी, तालुक्यातील स्थानिक संघटनेकरिता मुरुम गिट्टीकरित जागा राखीव करण्यात यावी.
तसेच महाराष्ट्र शासनाचा १२ जानेवारी २0१८ राजपत्र भाग ४ ब हा जीआर रद्द न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी ट्रॅक्टर चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष विजय मडावी, उपाध्यक्ष शिवशंकर वाडगाये, सचिव मनोहर राऊत, सहसचिव ऋषीकोरे, कोषाध्यक्ष मदन रहिले, सहकोषाध्यक्ष भोजराज प्रजापती, सदस्य तिलक राऊत, सुरेश साखरे, शालू पंधरे, अरविंद शेंडे आदी उपस्थित होते