श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची ३८८ जयंती मोठ्या हर्षोउल्हासात साजरी

0
26

लाखनी, ,दि.२० : श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती, लाखनी द्वारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची ३८८ जयंती मोठ्या हर्षोउल्हासात साजरी करण्यात आली. यावेळी दुपारी २ वाजता भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. संध्याकाळी ६ वाजता समर्थ प्रांगणावर प्रसिद्ध शिववक्ते अनिरुद्द्ध पाठक यांचे शिवव्याख्यान आयोजित करण्यात आले होते. शिव्व्याख्यानाचे उदघाटन विधानपरिषद आमदार डॉ परिणय फुके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुरमादी सरपंच सुनीता भालेराव, आल्हाद भांडारकर उत्सव समितीचे अध्यक्ष बाबुराव निखाडे यांची उपस्थित होते.
शिवाजी महाराज हे इंजिनियर होते ते किल्ले बांधणे आणि तेवढेच ह्युमन इंजिनियर होते असे म्हणता येते कारण त्यांनी तेवढ्याच कुशलतेणे माणसेही जोडली होते. युद्ध कला एवढी प्रभावी होती कि याजही अनेक राष्ट्रे महाराजांच्या युद्ध नितीनचा अभ्यास करतात. महाराजांच्या प्रत्येक युद्धामध्ये वेगळेपण जाणवते त्यांनी गनीमकावा या प्रसिद्ध युद्धशात्राचा शोध त्यांनी लावला आहे. त्यांचे आरमार असो की सैन्य ते महाराजांवर श्रद्धा असलेले होते. आणि म्हणून आन आजही ३८८ वर्ष उलटून महाराजांची जयंती साजरी करतो. आपसूकच श्री छत्रपती शिवाजी महाराज की, म्हंटल की जय हा जयघोष मनाच्या अंतर्मनातून निघतो ही श्रद्धा आजही जिवंत आहे. याचे कारण ही एकच राजा होऊन गेला की त्यांचे एक एक गन आपण आपल्या विचार आचरणात आणले तरी देशातील अर्ध्या समस्या दूर होतील, असे आपल्या ओजस्वी वाणीतून अनिरुद्ध पाठक यांनी शिवाजी महाराजांचे विचार मांडले.
या कार्यकेमदरम्यान स्वप्नपूर्ती संस्थेतर्फे विविध पुरस्कार देण्यात आले, त्यातील मोती सन्मान पुरस्कार डॉ चंद्रकांत निंबार्ते याना देण्यात आले. यासोबतच जिल्हास्तरीय वक्तुत्व स्पर्धेतील नेहा गाभणे, चेतना तळवेकर, देवयानी बेलपांडे, इशिका राऊत, पेजल भुरे, अवंती सिंगनजुडे, दुर्गा   आतकरी, आर्यन गोमासे याना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय बक्षीस देण्यात आले. या भव्य शोभायात्रेत विविध शाळांच्या झांकी, ढोल ताशा, वेशभूषाधारी शिवाजी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते. व्यापारीवर्गातून शरबत, नास्ता, महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. या उत्सवासासाठी उपाध्यक्ष संजय वणवे, सचिव ऍड कोमलदादा गभणे, अजिंक्य भांडारकर, प्रशांत वाघाये, प्रवीण शेलार, कौस्तुभ भांडारकर, बाळासाहेब चव्हाण, प्रा उमेश सिंगनजुडे, प्रा संजय निंबेकर, किशोर वाघाये, विक्रम रोडे, नितेश टिचकुले, विष्णुदास तळवेकर, गोपाल नाकाडे, पंकज भिवगडे, अमित भिवगडे, जयसिंग राठोड, ऍड स्वप्नील गायधनी, गुणवंत दिघोरे, लक्ष्मण बावनकुळे, सुधीर काळे, विकास पडोळे, नंदू चोधरी, सतीश चिवाणे, अजय बावनकर, विशाल हटवार, गिरीश शेंडे उत्सव यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
यावेळी उत्तमराव वरकड, भीमराव गभणे, शेषराव गिऱ्हेपुंजे, लवकुश निर्वाण, अर्पित गुप्ता, रा म गिरी, डॉ दिगंबर कापसे, श्याम पंचवटे,  होमेशवर गोमासे, पुरुषोत्तम खेडीकर, रुचिरा खेडीकर, सुभाष खेडीकर, अनुराधा भांडारकर, वंदना खेडीकर, अक्षय मासूरकर, घनश्याम कापगते, आ साठवणे, योगराज डोर्लीकर, ताराराम हुमे, सौ संध्या हेमाने, किशोर आळे, लुटे गुरुजी आदी मोठ्या प्रमाणावर श्रोतृ वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबुराव निखाडे, संचालन ऍड कोमलदादा गाभणे तर आभार प्रशांत वाघाये यांनी मानले.