जीआर अन्यायकारक,पण समस्या मार्गी लावू-राजकुमार बडोले

0
28

मा.खासदार पटोले,डॉ.बोपचेंसह माजी आमदार बनसोड यांचेही धरणे आंदोलनाला भेट

गोंदिया,दि.२१ः मागच्या अनेक वर्षापासून आपण शासनाची सेवा करीत आहात.त्यामुळे अशा परिपत्रकामुळे आपली qचता वाढलेली आहे.मी तुमच्या सोबत आहे.यासंदर्भात मुख्यमंत्री चर्चा करुन समस्या मार्गी लावून असे आश्वासन सामाजिक न्याय व Ÿविशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.विशेष म्हणजे या शासननिर्णायाची बातमी बेरार टाईम्सन्युजपोर्टलने सर्वात आधी प्रकाशित केले होते.
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने ९ फेबुवारी रोजी कंत्राटी कर्मचाèयांच्या सेवा नियमित न करण्याचे परिपत्रक काढले.या परिपत्रकातील जाचक अटीमुळे अनेक कंत्राटी कर्मचाèयांवर बेरोजगार होण्याची पाळी आली आहे.त्यामुळे हा शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी गोंदिया जिल्हा शासकीय कंत्राटी कर्मचारी महासंघाच्यावतीने आज(दि.२१) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले होते.या आंदोलनला माजी खासदार डॉ.खुशाल बोपचे,माजी खासदार नाना पटोले,माजी आमदार दिलीप बनसोड,जि.प.उपाध्यक्ष हामीद अल्ताफ अली,सभापती रमेश अंबुले,माजी सभापती पी.जी.कटरे,समाजकल्याण सभापती विश्वजित डोंगरे,माजी जि.प.उपाध्यक्ष विनोद अग्रवाल,जिल्हा परिषद गटनेते गंगाधर परशुरामकर,भंडारा-गोंदिया लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष प्रफुल अग्रवाल,संजय टेंभरे,लिलाधर पाथोडे,हौसलाल रहागंडाले,जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे,सीईओ एम राजा दयानिधी आदींनी भेट दिली.यावेळी माजी खासदार पटोले यांनी तरुण कंत्राटी कर्मचाèयांवर होणार अन्याय खपवून घेतला जाणार नाही.हे शासन आत्महत्या करायला लावणारे शासन आहे.तरुण कर्मचाèयांनी निराश होवून आत्महत्या न करता शासनाला आत्महत्या करण्यास भाग पाडावे असे आवाहन केले.तर माजी खासदार डॉ.बोपचे यांनी आपल्या लढाईमध्ये आपणही सहभागी असून ज्या निर्णयामूळे लाखो कुटुंबावर उपासमारीची वेळ येत असेल तर त्याविषयी शासनाकडे आपली भूमिका पोचवून सदर शासन निर्णय रद्द करण्यासाठी सोबत राहण्याचे आश्वासन दिले.माजी आमदार दिलीप बनसोड यांनी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सभागृहात याविषयावर सरकारला आक्रमकपणे जाब विचारणार असून चुकीचा शासन निर्णय रद्द करण्याच्या लढाईत कंत्राटी कर्मचारीसोबत असल्याची ग्वाही दिली.यावेळी विनोद अग्रवाल,पी.जी.कटरे,गंगाधर परशुरामकर,हौसलाल रहंगाडाले,लिलाधर पाथोडे,संजय टेंभरे यांनीही विचार व्यक्त केले.त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्यामार्फेत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले.आंदोलनाचे नेतृत्व महासंघाचे अध्यक्ष सुनिल तरोणे,अतुल गजभिये,विकास कापसे,सुर्यकांत रहमतकर,भागचंद रहागंडाले,राजन चौबे,कुलदिपीका बोरकर,ग्रिष्मा वाहने,राजू येळे,मनोज तिवारी,मनोज बोपचे,जितेंद्र येरपुडे,उमेश भरणे,गजानन धावडे,डी.जी.ठाकरे,अरविंद बिसेन,श्रीकांत त्रिपाठी यांनी केले.संचालन दिलीप बघेले यांनी केले.या आंदोलनात राष्ट्रीय आरोग्य अभियान, सर्व शिक्षा अभियान,स्वच्छ भारत मिशन, जिल्हा एड्स नियंत्रण विभाग, राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना, पंतप्रधान/मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, उमेद अभियान, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, जलस्वराज्य, भूजल व सर्व्हेक्षण विकास यंत्रणा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, बाल श्रमिक विभाग, पाणलोट विभाग, जलयुक्त शिवार, महिला बालविकास विभाग, आत्मा आदी विभागातील कंत्राटी  कर्मचाèयांच्या २७ संघटना सहभागी झाल्या होत्या.