रेल्वेस्थानकात लागले छत्रपतींचे छायाचित्र

0
10

तुमसर,दि.05 : तुमसर रोड रेल्वेस्थानकात शिवाजी महाराजांचे छायाचित्र रेल्वे प्रशासनाने काढली होती. हे कळताच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांच्या नेतृत्वात शेकडो शिवसैनिकांनी स्टेशन प्रबंधकास घेऊन जाब विचारला. उत्तरे देण्यास असमर्थ ठरलेल्या स्टेशन प्रबंधकांनी शिवाजी महाराजांचे छायाचित्र आणून कार्यालयासमोर पुष्पहार घातला. झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
तुमसर शहर व तालुका शिवसेनेने रविवारी शिवजयंती साजरी केली. तुमसर रोड रेल्वे स्थानकात दर्शनी भागात शिवाजी महाराजांची मोठी फोटो लावली होती. रेल्वे स्थानकाची कामे करतानी कर्मचाºयांनी शिवाजी महाराजांचे फोटो काढून ठेवले होते. कामे झाल्यावर ती पुन्हा लावली नाही. शिवजंयती निमित्त शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले, शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकासोबत तुमसर रोड रेल्वे स्थानकात पोहोचले. तिथे शिवाजी महाराजांची फोटो दिसली नाही. यासंदर्भात पटले यांनी स्टेशन प्रबंधक राजेश गिरी यांना विचारणा केली. त्यांनी घटलेल्या प्रकाराबद्दल दिलगीरी व्यक्त केली.
स्टेशन प्रबंधक गिरी यांनी अधिनस्थ कर्मचाऱ्यांना तात्काळ फोटो आणण्याचे निर्देश दिले. फोटो आणल्यानंतर शिवसेना जिल्हा प्रमुख स्टेशन प्रबंधक राजेश गिरी व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी विधीवत पूजा करुन माल्यार्पण केले. यावेळी शिवाजी महाराजांच्या घोषनेने रेल्वेस्थानक दणाणून गेले. याप्रसंगी उपजिल्हा प्रमुख प्रकाश पारधी, तालुका प्रमुख नरेश उचिबघले, भास्कर भोयर, प्रसिध्दी प्रमुख अमित मेश्राम, युवासेना उपजिल्हा प्रमुख मनोज चौबे, संजय डहाके, मनोहर जांगळे, प्रकाश लसुंते, नितीन सेलोकर, जगदीश त्रिभूवनकर, किशोर यादव, गुड्डू डहरवाल, कैलास जलवाने, विक्रांत तिवारी, दिनेश पांडे, मोहनीश साठवणे, निशांत वनवे, मनिष करंबे, मिलिंद खवास, ईश्वर भोयर, संजय झंझाड, निलेश पाटील सह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.