बोगस औषधी तयार करुन विकणार्या रॅकेटचा पर्दाफाश

0
49

गोंदियाच्या शासकीय महिला रुग्णालयातील औषध निर्मात्यासह 4 विक्रेत्यांचा समावेश

गोंदिया,दि.18- बनावटी औषधी तयार करून त्यावर बोगस लेबल लावून चक्क गोंदियातील बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात त्या बनावटी औषधी विक्री केल्याचे प्रकरण समोर आल्याने जिल्ह्यासह राज्यात खळबळ माजली असून याप्रकरणी अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिसांनी बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयाच्या मुख्य औषधी निर्मात्यासह अन्य चार औषधी विव्रेâत्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे गोंदियातील सरकारी महिला दवाखान्यातील महिलांचे आरोग्य बनावटी औषधांमुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सविस्तर असे की, अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरिक्षक फिर्यादी मनिष गोतमारे यांच्या तक्रारीवरून आरोपी मितू अग्रवाल रा. भगवर इंदोर, रामसिंग कुंवरसिंग भारव्दाज(हे नगरपरिषदेचे सेवानिवृत्त अग्निशमक विभागाचे प्रमुख व माजी नगरसेविका सरला भारद्वाज यांचे नातेवाईक), संचालक साईधाम मेडीकल अ‍ॅण्ड जनरल स्टोअर्स गोंदिया, निलेश किर्तीकुमार संचेती, सम्राट फॉर्मासिटीकल नागपूर, निलेश एन. घोेरसे, रा.शि.फार्मा नागपूर, मोहम्मद आजिफ अब्दुल, औषधी निर्माता प्रमुख औषधी विभाग बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय गोंदिया यांचेविरूद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीनुसार १० फेब्रुवारी ते १७ जुलै २०१७ दरम्यान हुमन बॉयोग्राफिकचे संचालक मिथु अग्रवाल यांच्याकडून खरेदी केलेली औषधी रामसिंग भारव्दाज यांनी अधिक दराने विकत घेतलेली औषधी कमी दराने विकल्याचे तपासात आढळून आले. ही औषधी बनावटी असल्याचे तपासात निष्पन्न झाले. तसेच साईधाम मेडीकल अ‍ॅण्ड स्टोअर्स संचालक रामसिंग भारव्दाज व सम्राट फॉर्मासिटीकल नागपूरचे निलेश किर्तीकुमार आणि भागीदार निलेश संचेती तसेच निलेश एन घोरसे व बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात मुख्य औषधी निर्माता पदावर कार्यरत असलेले मोहम्मद आजिब अब्दुल यांनी क्लेबल इंजेक्शन १.२ ग्रॅम, एम्क्सोक्लीन अ‍ॅण्ड पोटॅशिअम क्लेवीनेट,आयपीओ समूह क्रमांक १६ डीएल ०७ एच.एम./ डी.१२/२०१६-डी/इ.५/२०१८ एमकेटी बाय.ए/हुमन बॉयो आरगेनिक पीवीटी लिमीटेड ठाणे बाय एम/एम एमएस जी हेल्थ केअर,(त्रिलोकपूर, ऑम्प रोड जि.शिरमोर) यांनी बनावटी व अप्रमाणित औषधाची साठगाठ करून जिल्हा महिला रूग्णालयाला विक्री केल्याचे प्रकरण समोर आले आहे. यामुळे रूग्णाचे आरोग्य धोक्यात प्रकार समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप आरोपींना अट़क केली नसून ह्याअगोदर गेल्या कित्येत वर्षापासून हे बनावटी औषधी तयार करणारे रॅकेट सक्रिय असतानादेखील अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या डोळेझाकपणामुळे याकडे कुणाचेही लक्ष नाही. मात्र,बनावटी औषधी तयार करून नागरिकांच्या जीवाशी खेळ मांडण्यासारखाच हा प्रकार आहे.याप्रकरणात गोंदिया शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक नार्वेकर हे तपास करीत असून त्यांनी नाव उघड करु नका तपासात अडचणी येतात असे सांगितले.जेव्हा की याप्रकरणातील सर्व आरोपींची नावे एका सायं.दैनिकात पोलीसांच्या सुत्रानुसारच प्रकाशित झालेली असताना नाव न प्रकाशित करण्यामागे काय उद्देश अशा प्रश्न सुध्दा चर्चेला आला आहे.

शासकीय स्त्री रुग्णालयाच्या औषध निर्माता प्रमुख पदावर असलेल्या मोहम्मद आजिप अब्दुल यांने कुणाच्या आदेशावर हे काम केले.त्यावेळी जर रुग्णालयात औषधांची गरज पडली असेल तर त्यावेळच्या वैद्यकीय अधिकारी किंवा जिल्हा शल्य चिकित्सकांच्या परवानगीशिवाय कुठलीही औषध खरेदी करता येत नाही.अशात जर ही खरेदी झाली असेल तर त्यावेळी कार्यरत असलेल्या बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकासह निवासी वैद्यकीय अधिकारी यांची सुध्दा सखोल चौकशी करुन शासनाने त्यांच्यावर याप्रकरणात कारवाई करण्याची खरी गरज निर्माण झाली आहे.