ग्रामगीता प्रत्येक गावाची मार्गदर्शक व्हावी-सुधीर मुनगंटीवार

0
12

चंद्रपूर दि.१९ : ज्या मातीमध्ये आदर्श गावगाडा कसा असावा, याचा ग्रंथ लिहिला गेला. ज्या ठिकाणी ग्रामोन्नतीचा पाया राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्वत: रचला, ज्या ठिकाणी त्यांनी सक्षक्त गाव व देशभक्तीचा नारा बुलंद केला. त्या चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक गावाचा आदर्श ग्रामगिता असली पाहिजे. त्या वाटेवर वाटचाल करणाऱ्या ग्रामसेवकांचा सत्कार आज करता आला, याचा आनंद असल्याचे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या वतीने आदर्श ग्राम पुरस्कार वितरण सोहळा, आदर्श ग्रामसेवक पुरस्कार सोहळा व जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामसेवक यांची कार्यशाळा प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला उदघाटक म्हणून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते.
अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर उपस्थित होते. व्यासपिठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, गुरुदेव सेवाश्रम पाठसूळ अकोला येथील राष्ट्रीय प्रबोधनकार डॉ.उध्दव गाडेकर महाराज, औरगांबाद जिल्हयातील पाटोदा ग्रामपंचायतीचे सरपंच भास्कर थेरे पाटील, उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, सभापती संतोष तंगडपल्लीवार, ब्रिजभूषण पाझारे, अर्जना जीवतोडे, गोदावरी केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रभु जाधव, रवींद्र मोहिते, ओमप्रकाश यादव आदींची उपस्थिती होती. दुसºया सत्रामध्ये बोलताना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेचा आदर्श ठेवत काम करण्याचे सांगितले.