शेतकरी हीच जात, शेतकरी पुत्र लढणार निवडणुक

0
8

नागपूर,दि.02 – आता शेतकरी हीच एकमेव जात. न्याय मिळवायचा असेल तर जातीपातीला मूठमाती द्यायची आणि हक्कासाठी एकत्र येऊन लढायचे… नागपुरात शेतकऱ्यांनी एका बैठकीत हा निर्धार व्यक्त केला. शिवाय त्या दिशेने वाटचालही सुरू केली. कोणताही मोठा राजकीय पक्ष असाे, ते शेतकऱ्यांचे शत्रूच आहेत. त्यामुळे शेतकरी हीच एकमेव जात समजून शेतकऱ्यांना बळ देणारा समर्थ राजकीय पर्याय देण्याचा निर्णय शनिवारी पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीत नेत्यांमध्ये अनेक मुद्द्यांवर मतभेद आढळून आले असले तरी कालांतराने ते सोडवले जातील, असा विश्वासही बैठकीतील नेत्यांनी व्यक्त केला.लोकजागरचे नेते प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांच्या पुढाकाराने नागपुरात ही बैठक पार पडली. या बैठकीत शंभर युवा आणि महाराष्ट्र नवा हा नारा देत आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतकरी नेते विजय जावंधिया, चंद्रकांत वानखडे, अमर हबीब, शरद पाटील, गजानन अमदाबादकर, विजय विल्हेकर, श्रीकांत तराळ या नेत्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत अनेक सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.