संविधान न्याय यात्रेचे अर्जुनी मोर,कोहमारा व गोरेगावात होणार स्वागत,गोंदियात जाहीर सभा

0
30

अर्जुनी मोरगाव,दि.२७ :ओबीसींची जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे, या प्रमुख मागणीला घेऊन ओबीसी प्रवर्गाच्या वतीने देशव्यापी ओबीसी जातनिहाय जनगणना अभियान राज्यभर राबिवले जात आहे.त्याअंतर्गत  पुणे येथील समताभूमीतून 11 एप्रिलला निघालेली  ओबीसी संविधान न्याय यात्रेचे गोंदिया जिल्ह्यात रविवार दि. २९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता आगमन होत आहे.

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथे सकाळी 10 वाजता सविंधानिक न्याय यात्रेचे आगमन होणार असून ओबीसी संघर्ष कृती समिती व ओबीसी सेवा संघाच्यावतीने स्वागत करण्यात येणार आहे.त्यानंतर अर्जुनी मोरगाव येथील समाजसेविका प्राचार्य सुनिताताई हुमे यांच्या विद्यालयाच्या सभागृहात छोटेखानी सभा व पत्रपरिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.त्यानंतर ही यात्रा सडक अर्जुनीकडे रवाना होणार असून कोहमारा येथे 12 वाजता यात्रेचे स्वागत सडक अर्जुनी ओबीसी संघर्ष कृती समिती व ओबीसी सेवा संघाच्यावतीने व दुपारी 1 वाजता गोरेगाव येथे करण्यात येणार आहे.सायकांळी 5 वाजता गोंदिया शहरात सविंधानिक न्याय यात्रा भ्रमणकरीत शास्त्रीवार्ड येथे ओबीसी संघर्ष कृती समिती,ओबीसी सेवा संघ व बहुजन एकता मंचच्यावतीने आयोजित जाहीर सभास्थळी  दाखल होणार आहे.

ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, भटके विमुक्त, अल्पसंख्यांकांना सुरक्षा व नागरी हक्क मिळाले पाहिजे, सर्व मागासवर्गीय आयोगाची अमलबजावणी झाली पाहिजे, भीमा कोरेगाव प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, देशामध्ये सर्वांसाठी समान शिक्षा व समान स्वास्थ्यनिती त्वरित लागू करावी, मुस्लिम समाजासाठी रंगनाथ तथा सच्चर आयोगाच्या शिफारशी त्वरित लागू कराव्या, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट मधील कॉलेजियम व्यवस्था रद्द करून युपीएससी प्रमाणे एआयजेएससी ची स्थापना करून क्रियांनवयन त्वरित करावे,खाजगी क्षेत्रात ओबीसी, एससी, एसटी यांना त्वरित आरक्षण लागू करावे , मागासवर्गीयांचे बढतीमधील थांबलेले आरक्षण घटनादुरुस्ती करून पूर्ववत सुरू करावे व ते ओबीसींना सुद्धा लागू करावे, ओबीसींसाठी असलेली क्रिमिलेयरची अट त्वरित रद्द करावी या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी समता भूमी पुणे ते चैत्यभूमी मुंबई अशी 11 एप्रिल ते 11 मे दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व जिल्ह्यात हे यात्रा अभियान राबिवले जात आहे.

दरम्यान या यात्रेचा ताफा रविवारी शहरात दाखल होईल.रॅलीसोबत आ. हरिभाऊ राठोड, डॉ. ज्ञानेश्वर गोबरे, प्रा. सुषमा अंधारे , प्रा. श्रावण देवरे डॉ. बबनराव तायवाडे,डाॅ.खुशालचंद्र बोपचे, इंजिनिअर प्रदीप ढोबळे हे राहणार आहेत.तरी या यात्रेत नागरिकांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन  गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष बबलू कटरे,ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष बी.एम.करमरकर,,बहुजन एकता मंचचे अध्यक्ष सुनिल भोंगाडे,युवा स्वाभीमानचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सहसचिव खेमेंद्र कटरेओबीसी संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष अमर वराडे, कैलास भेलावे,सावन कटरे,संतोष खोब्रागडे,राजेश कापसे,शिशिर कटरे,प्रमोद लांजेवार, गिरिश बागडे,उध्दव मेहदंळे,दिनेश हुकरे,हरिष कोहळे,राजेश नागरीकर,कमल हटवार,राध्येशाम भेंडारकर,बालू बडवाईक,बंशीधर शहारे,दिलीप चव्हाण,चौकलाल येडे,गुड्डू कटरे,लिलेश्वर रहागंडाले,विलास चव्हाण,प्रेमलाल साठवणे,बी.जी.पटले,खुशाल कटरे,सावन डोये,डाॅ.संजीव रहागंडाले,जिवन लंजे,तिर्थराज उईके,रवी भांडारकर आदीनी केले आहे.तसेच अखिल भारतीय बंजारा समाज , माळी महासंघ, भावसार समाज , परीट धोबी सेवा मंडळ, तेली महासंघ, कुणबी समाज, गोपाळ समाज,पोवार युवा समिती, शिंपी समाज, गुरव समाज, धनगर समाज, कुंभार समाज, लोहार समाज, कोहळी समाज,कलार समाज महासंघ, सुतार समाज, साळी समाज, कोष्टी समाज, यांच्यासह ओबीसी प्रवर्गातील विविध संघटनांनी केले आहे.