केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांनी केले सी 60 व सीआरपीएफ जवानांचे कौतुक

0
6

गडचिरोली,दि.30 : केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांनी पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे भेट देऊन पोलीस उप महानिरीक्षक अंकुश शिंदे,पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांचे अभिनंदन करत ऐतिहासिक कामगिरी करणारे गडचिरोली पोलीस दलातील सी 60 व सी आर पी एफ जवानांचे कौतुक केले.अतिशय खडतर परिस्थितीत राहून व अतिशय प्रभावीपणे सातत्याने उत्कृष्ट कामगिरी बजावीत गडचिरोली पोलीस दलाने मोठ्या प्रमाणावर यश मिळविल्याचे नमूद करत त्यांनी कसनासुर व नैनेर जंगल परिसरातील चकमकीमध्ये सहभागी सी 60 पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच सी आर पी एफ जवान यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.पोलिसांचा सातत्यपूर्ण कामगिरीमुळे भविष्यात गडचिरोली जिल्ह्यातून नक्षलवाद्यांचा समूळ नायनाट होण्यास मदत होईल याबाबत शंका नसल्याचे त्यांनी म्हटले.तसेच महोवाद्यांनी शस्त्रे टाकून मुख्य प्रवाहात यावे व लोकशाहीचा मार्ग स्वीकारावे असे आवाहन केले.यावेळी पोलीस उप महानिरीक्षक अंकुश शिंदे सो.यांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री अहिर यांचे आभार मानले.आपल्या प्रेरणेमुळे पोलीस दलाचे मनोधैर्य वाढल्याचे सांगून गडचिरोली पोलीस दल प्रामाणिकपणे काम करत नक्षलवाद विरोधात अधिक तत्परतेने काम करेल याची ग्वाही दिली