मेडिकलमध्ये लोकलेखा समितीचा दौरा आज

0
17

नागपूर,दि.9ः- मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये अनेक तांत्रिक त्रुट्या आहेत. काही समस्या सोडवून ट्रॉमा सेंटर सुरू करण्यात आले. परंतु, आजही अनेक अडचणी व समस्यांचे समाधान होऊ शकले नाही. कदाचित हेच कारण आहे की आतापयर्ंत ट्रॉमा केअर सेंटरमध्ये रुग्णांना थेट प्रवेश दिला जात नाही. या सर्व समस्यांना घेऊन उद्या मंगळवार ९ मे रोजी लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ. गोपालदास अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील समिती मेडिकलमध्ये येणार आहे. या दौर्‍याला घेऊन मेडिकल प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
पंतप्रधान आरोग्य योजनेंतर्गत मेडिकलमध्ये १५0 कोटींतून ट्रामा केअर उभारण्यात आले. यात १२५ कोटी राज्याचे, तर २५ कोटी केंद्राचा हिस्सा होता. तत्कालीन अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागप्रमुख व बांधकाम विभागातील अभियंत्यांच्या समितीने ट्रॉमाच्या नकाशाला मंजुरी दिली होती. दरम्यान, एका विभागप्रमुखाने ट्रॉमामध्ये जवळजवळ ४0 त्रुट्या असल्याचे सांगून आक्षेप घेतला होता. पण, त्या विभागप्रमुखांना समितीतून बाहेरून रस्ता दाखविण्यात आला होता. त्यानंतर मेडिकलच्या अधिष्ठातापदी डॉ.अभिमन्यू निसवाडे यांची नियुक्ती करण्यात आली. दरम्यानच्या काळात ‘ट्रॉमा केअर सेंटरचा ड्रॉमा’ अधिवेशनात उचलण्यात आला. त्यानंतर न्यायालयाने ट्रॉमा सेंटर २ महिन्यात सुरू करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानुसार ट्रामा सेंटर सुरू झाले खरे. पण, आजही अनेक त्रुट्या आहेत. नुकतेच ट्रामा सेंटरमध्ये अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.अनिल गोल्हर यांची प्राध्यापकाच्या रूपाने नियुक्ती करण्यात आली. पण, ट्रामा सुरू झाल्यापासून हे पद रिकामेच होते, हे येथे उल्लेखनीय.