मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्या ८१ वीज कर्मचाºयांचा घरभाडे भत्ता गोठविला

0
11

गोंदिया,दि.02 – मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्या महावितरण अधिकारी आणि कर्मचाºयांचा घरभाडे गोठविण्याच्या सुचना प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी मागच्या आठवड्यात केल्या होत्या.सुचनेच्या अनुषंगाने विदर्भातील तब्बल ८१ अधिकारी आणि कर्मचाºयांचा घरभाडे गोठविण्याचे आदेश निगर्मित करण्यात आले आहे. याशिवाय यापुर्वी घरभाडे भत्ता गोठवूनही मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्या 35 अधिकारी आणि कर्मचाºयांना आपल्यावर कार्यवाही का करण्यात येऊ नये या आशयाची कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे.

प्रादेशिक संचालकांनी मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्या अधिकारी आणि कर्मचाºयांचा घरभाडे भत्ता गोठविण्याच्या स्पष्ट सुचना केल्या होत्या आणि त्यासंदर्भातील अहवाल तीन दिवसात प्रादेशिक कार्यालयाकडे सादर करण्याबाबतही सांगितले होते. याअनुषंगाने महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत असलेल्या वर्धा मंडळातील सर्वाधिक १४ तर त्याखालोखाल नागपूर ग्रामिण, बुलढाणा आणि यवतमाळ मंडळातील प्रत्येकी १० , अकोला मंडळातील ९, अमरावती मंडळातील ८, वाशिममंडळातील ७, गडचिरोली मंडळातील ५ तर नागपूर शहर मंडळातील ४, भंडारा मंडळातील ३  तर चंद्रपूर मंडळातील १, अश्या एकूण ८१ अधिकारी आणि कर्मचाºयांचा घरभाडे भत्ता जून महिन्याच्या मासिक वेतनापासून गोठविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या ८१ मध्ये वेतनश्रेणी दोन मधील ९, वेतनश्रेणी तीन मधील २४ तर वेतनश्रेणी चार मधील ५७ जणांचा समावेश आहे.

याशिवाय यापुर्वी घरभाडे भत्ता गोठवूनही मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्या ३५ जणांना कारणे दाखवा नोटिस बजाविण्यात आली आहे. यात नागपूर ग्रामिणमंडळातील १८ , वर्धा मंडळातील १२, नागपूर शहर मंडळातील ४ तर यवतमाळमंडळातील एका कर्मचाºयांचा सहभाग असून यात वेतनश्रेणी दोन मधील ३, वेतनश्रेणी तीन मधील ९ तर वेतनश्रेणी चार मधील २३ जणांचा समावेश आहे.