गोव्यातील कलंगुट बीचवर अकोल्यातील पाच जणांचा मृत्यू

0
11

अकोला,दि.12 : गोव्यात समुद्रकाठावर सहलीला गेलेल्या 14 मित्रांपैकी पाच जणांचा सकाळी 6.15 वाजता कलंगुट बीचवर काढलेला सेल्फी त्यांच्या आयुष्यातील शेवटचा ठरला. अवघ्या पंधरा मिनिटात सर्वकाही संपले! गोव्याच्या बिचवर मृत्यू तांडव सुरू असताना मोठ्या उमरीतील विठ्ठल मंदिर परिसरात घटनेची वार्ता पोहोचली आणि एकच हाहाकार उडाला.अकोल्यातील पाच तरुणांचा कलंगुट बीचवरील समुद्र किनाऱ्यावर सोमवारी पहाटे बुडून मृत्यू झाला. मोठी उमरीतील विठ्ठल नगरमध्ये राहणारी ही पाचही मुलं सामान्य घरातील आहेत. मृतांमध्ये दोन भावांचा, एका कुटुंबातील एकुलता एक वारस आणि जुळ्या भावामधील एकाचा समावेश आहे. क्रिकेट खेळणाऱ्या सवंगड्यांपैकी 14 मित्र गोव्यात फिण्यासाठी शनिवारी अकोल्यातून निघाले होते. कदाचित त्यांच्या पैकी कुणालाही याची पुसटशी कल्पणाही नसेल की गोव्यात सहलीसाठी निघालो आहे पण, तेथेम मृत्यू त्यांची प्रतीक्षा करतो आहे. रविवारी रात्री मडगावला पोहोचल्यानंतर टॅक्सी करून 14 मित्र कलुंगडला पोहोचले. तेथे सोमवारी पहाटे बीचवर उतरल्यानंतर समुद्रांच्या लाटांनी त्यांना मोहीत केले. पाहता पाहता सर्व जण पाण्यात उतरले. सोबत न आलेल्या मित्रांना सेल्फी काढून गोव्यातील सहलीचे फोटोही पाठविले. मात्र, त्यातील पाच तरूणांसाठी सकाळी 6.15 वाजता पाठविलेला सेल्फी शेवटचा ठरला. 6.30 वाजेपर्यंत 14 पैकी पाच जण खवळलेल्या अरबी समुद्राच्या लाटेसोबत वाहून केले. डोळ्यासमोर मित्रांना लाटेत वाहून जात असल्याचे पाहून इतरांचा थरकाप उडाला. ही वार्ता गोव्यातून अकोल्यात पोहोचताच विठ्ठलनगरावर शोककळा पसरली.