जि.प.च्या महिला बालकल्याण विभागात निविदा घोटाळा

0
8

जि.प.सदस्य अर्जुन नागपूरे यांचा आरोप,
टेस्टींगचे प्रमाणपत्र दिले डिलरच्या नावे
बुधवारच्या स्थायी समितीत गाजणार मुद्दा

गोंदिया-गोंदिया जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याणविभागांतर्गत जिल्ह्यातील अंगणवाड्यांना पुरविण्यात येणाèया वाटरप्युरीफायरचा निविदेमध्ये घोळ असल्याचा आरोप जि.प.सदस्य अर्जुन नागपूरे यांनी केला आहे.पुरवठा करण्याकरिता निविदा आमqत्रत करण्यात आली होती.ही ई निविदा जाहिरातीनुसार १९ फेबुवारीला उघडण्यात येणार होती.परंतु शासकीय सुट्टी आल्याने ती निविदा २१ फेबुवारी रोजी उघडण्यात आली.वास्तविक जर कुणाला आक्षेप नोंदवायचे असल्यास ते निविदा उघडण्याआधी नोंदवायला हवे असे असताना महिला बालकल्याण विभागात मात्र ई निविदा उघडल्यानंतर आक्षेप अधिकाèयांनी स्वीकारले.बनावटी कागदपत्र जोडून काही पुरवठादारांनी ई निविदेत सहभाग घेतल्याचेही त्यांनी म्हटले आहे.तर पुर्ण कागदपत्रांची पुर्तता करणाèयांना डावलण्यात आल्याचेही म्हटले आहे.हा प्रश्न उद्या(२५) होणाया स्थायी समितीच्या बैठकित गाजण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सुमारे ३१ लाख ९० हजार रुपयाचा निधी या वाटर प्युरीफायरकरीता (जलशुध्दीकरण)मंजूर करण्यात आला असून ३० लीटर क्षमतेचा वॉटरप्युरीफायर पुरवठा करण्यासाठी निविदा आमंत्रित करण्यात आली होती.परंतु ज्या निविदा आल्या त्याकडे बघितल्यास रिंगसिस्टमने ही निविदा मॅनेज असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य अर्जुन नागपूरे यांनी केला आहे.विशेष म्हणजे या निविदाघोटाळ्याला घेऊन कृषी व पशुसंवर्धन सभापती मोरेश्वर कटरे यांनीही लेखी आक्षेप अधिकाèयाकडे नोंदविला आहे.निविदेमध्ये सादर केलेले कागदपत्र त्रुटीयुक्त असून त्या कागदपत्रांना ग्राह्य धरता येऊच शकत नाही.दरम्यान काही कागदपत्र हे शिवमल्हार लॅबारटीरज नागपूरद्वारे देण्यात आलेले टेस्टींग प्रमाणपत्रात खोडाखोड करुन तयार करण्यात आल्याचे व त्यावर एकाच प्रकारच्या स्वाक्षèया आहेत.तिन्ही पुरवठादारांना जवळपास सारख्याच कंपनीने व लॅबारटीरज ने प्रमाणपत्र दिले असल्याने साखळी पध्दतीने निविदा बळकावण्याचा प्रकार असल्याचेही नागपूरे यांचे म्हणने आहे.
यासाठी गोंदियातीलच ४ पुरवठादारांनी निविदा भरल्या.गोंदिया वगळता एकही इतर जिल्ह्यातील पुरवठादाराने qकवा स्वतःकंपनीने ई निविदा का भरली नाही,हे कोडे आहे.ज्या पुरवठादारांनी ई निविदा सादर केल्या,त्यामध्ये गोंदियाच्या नेहा आशिष असाटी यांच्या मालकीची बालाजी एँड कंपनी,श्रीमती उमादेवी आर.अग्रवाल यांच्या स्वास्तिक सप्लायर गोंदिया,न्यू व्हेरायटी स्टोअर्स गोंदिया आणि व्यकंटेशप्रसाद सत्यनारायण नायडू यांच्या दिव्या मार्केqटग कंपनी गोंदियाचा समावेश होता.आक्षेपाच्यावेळी नायडू यांच्या दिव्या मार्केqटगला बाद ठरविण्यात आल्याने वरील तीन पुरवठादार रांगेत होते.परंतु कागदपत्रांचा पडताळणी केल्यानंतर असे दिसून आले की वरील तिन्ही पुरवठादारांनी जे कागदपत्र जोडले त्यात काही कागदपत्र सारखेच असून कुठलाही प्रॉडक्ट तयार केल्यानंतर त्याच्या टेस्टींग रिर्पोट कंपनीला देण्यात येतो.परंतु निविदेमध्ये सादर केलेल्या कागदपत्रात डिलरच्या नावे टेस्टींगरिपोट देण्यात आल्याचे दिसून आले,ते चुकीचे असल्याचे नागपूरे यांनी सांगत ही निविदा प्रकिया रद्द करण्याची मागणी केली आहे.

प्रकिया स्थगित असून निर्णय प्रलqबत आहे-डेप्युटी सीईओ चव्हाण
यासंदर्भात महिला बालकल्याण विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.जी.चव्हाण यांना विचारणा केली असता दराची निविदा अद्याप उघडण्यात आलेली नसून ही निविदा प्रकियाच स्थगीत करण्यात आली आहे.त्यामुळे निविदा कुणाला मॅनेज करुन देण्याचा प्रश्नच नसल्याचे त्यांनी सांगत निर्णय प्रलqबत असल्याचे सांगितले.