रस्त्यावरील घाणपाणी बोडीत टाकण्यात येऊ नये

0
9

गोंदिया ,दि.१८-गोंदिया नगर परिषदेतर्फे इंगळे चौक येथील बोडीच्या सौंदर्यीकरणानंतर (बोडीत) रस्त्यावरील घाण पाणी जमा करण्याकरीता पाईपलाईप बसविण्यात येत आहे. असे केल्यास रस्त्यावरील घाण पाणी बोडीत जमा होईल काळातराने या बोळीतील पाण्याची दुगंर्धी आजूबाजूच्या परिसरात पसलेल व घाणपाणी जमीन मुरून भुजलसाठा प्रदूषित होईल.
रस्त्यावरील घाणपाणी बोळीत घालण्याकरीता विरोध केले असता फक्त पावसाच्या पाण्याने बोडी भरणार नाही त्याकरीता अतिरिक्त पाणी जमा करण्यासाठी पाईप लावण्यात येत असल्याचे तर्क लावून संबंधित विभाग नागरिकांची फसवणूक करीत आहे.यासाठी परिसरातील नागरीक अध्यक्षांना भेटले परंतु त्यांनतरही त्याकडे लक्ष दिलेले गेलेले नाही.
यावर उपाय योजना म्हणून रस्त्यावरील घाण पाणी बोडीत न टाकता परिसरात असलेल्या इमारतीतील छतावरील पाणी पाईप व्दारे बोडीत जमा करण्यात यावा त्यामुळे शासनाची जलयुक्त शिवार योजना व पाणी अडवा पाणी जिरवा यासारख्या धोरणाचा प्रचार होईल यामुळे सिव्हिल लाईन इंगळे चौक येथील बोडी ही रेनवॉटर हार्वेस्टींग सिस्टीम करीता रॉलमॉडेलचा काम करेल अश्या मागणीचे निवेदन गोंदिया निसर्ग मंडळाच्यावतीने नगराध्यक्ष व जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. निवेदन देताना गोंदिया निसर्गमंडळाचे मुकुंद धुर्वे, अशोक पडोळे, उमेंद्र भेलावे, जय देशमुख, प्रेम बिजेवार, संजय कारंडकर उपस्थित होते.