लोकप्रतिनिधींनी अनुभवली मेट्रो सफर

0
14

नागपूर : नागपूर मेट्रोतर्फे राबविल्या जाणाऱ्या जॉय राईड संकल्पनेचा प्रत्यक्ष अनुभव लोकप्रतिनिधींनी घ्यावा म्हणून शनिवारी खास लोकप्रतिनिधींकरिता ‘सेरिमोनियल राईड’चे आयोजन करण्यात आले होते.यात जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, आ. सुधाकरराव देशमुख, डॉ.मिलिंद माने, आ. समीर मेघे, आ. आशिष देशमुख, आ. जोगेंद्र कवाडे, आ. अनिल सोले, जि.प. सदस्य रुपराव शिंगणे, पंचायत समिती सदस्य रेखा मसराम, खापरी ग्रामपंचायतच्या सरपंच पार्वताबाई आत्राम, उपसरपंच सेवकराम सोनटक्के तसेच, ग्रामपंचायत सदस्य नितीन लोखंडे, ओमप्रकाश तेलरांधे, सचिन वानखेडे, प्रभाकर जुमडे, सिंधूबाई झाडे, बेबीबाई धुर्वे, प्रियतमा वाघाडे, लताबाई गवई आणि लक्ष्मीबाई मसराम आदी सहभागी झाले होते.
एअरपोर्ट (साऊथ) स्टेशन येथून जॉय राईडला सुरुवात झाली. या मार्गावरील न्यू एअरपोर्ट आणि खापरी स्टेशनचा हा पूर्ण दौरा महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्यासोबत केला. यावेळी एअरपोर्ट (साऊथ) स्टेशन येथे पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष तिकीट काढून तिकीट विक्री व्यवस्था जाणून घेतली. तसेच स्थानकांवर दिव्यांगांकरिता असलेल्या सोईची माहिती जाणून घेतली. खापरी स्टेशन येथे कंट्रोलिंग सिस्टीम, सीसीटीव्ही सर्व्हिलन्स, सोलर सिस्टीम, इमर्जंसी दूरध्वनी सेवा, सब-वे येथील आर्ट वर्क, मुख्य गेट आर्किटेक्चर तसेच न्यू एअरपोर्ट स्टेशन येथील भगवान गौतम बुद्धाच्या प्रतिमेचे दर्शन घेतले.राईड संपल्यावर लोकप्रतिनिधींकरिता विविध विषयांवर सादरीकरण करण्यात आले.यावेळी संचालक (प्रकल्प) महेश कुमार, संचालक (रोलिंग स्टॉक) सुनील माथुर, संचालक (वित्त) एस. शिवमाथान उपस्थित होते.