लाखनी ओबीसी सेवा संघानेही नोंदविला केंद्रसरकारचा निषेध

0
12

लाखनी,दि.25ः- वैद्यकीय प्रवेशात ओबीसी प्रवर्गाला केंद्रीय कोट्यातील प्रवेशामध्ये २७ टक्के आरक्षण न देता फक्त २ टक्केच आरक्षण देण्यात आल्याच्या निषेधार्थ लाखनी तालुका ओबीसी सेवा संघ,ओबीसी विद्यार्थी संघटनेच्यावतीने तहसिलदारांना निवेदन सादर करण्यात आले.निवेदनात केंद्र सरकारने ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर केलेला अन्याय त्वरीत दूर करण्यात यावे. आरक्षणाच्या धोरणानुसार एस.सी. व एस.टी प्रवर्गाला नियमानुसार आरक्षण देण्यात आले आहे. परतु ओबीसी प्रवर्गाला २७ टक्के आरक्षण असतांना देखील फक्त २ टक्केच आरक्षण केंद्रीय वैद्यकीय प्रवेश समितीने दिल्याने ओबीसींच्या २५ टक्के जागा अनारक्षित खुल्या प्रवर्गाकडे वळविल्या गेल्या आहेत.त्यामुळे ओबीसी विद्यार्थ्यावर केंद्रातील सरकारने केलेला अन्याय त्वरीत दूर करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष उमेश सिंगनजुडे, उपाध्यक्षअशोक फ.गायधनी ,शिक्षकपरिषदेचे यादवराव गायकवाड ,सचिव गोपाल नाकडे ,,शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष्य बाबूरावजी निखाडे ,प्राथमिक शिक्षक संघाचे रशेषश्कुमार फटे, अशोक देशमुख भास्कर गिर्हेपुंजे, लाकेश धरमसारे सुनील चाफले ,नरेंद्र झलके,नरेश भदाडे उपस्थित होते.