अर्धनारेश्वरालय हलबीटोला येथे आज प्रधानमंत्री मुद्रा योजना मेळावा

0
11

गोंदिया,दि.२६ : महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हास्तरीय प्रधानमंत्री मुद्रा योजना समन्वय समिती आणि नियोजन विभाग यांच्या संयुक्त वतीने आज २७ जून रोजी सकाळी ११.३० वाजता सालेकसा तालुक्यातील अर्धनारेश्वरालय हलबीटोला येथे प्रधानमंत्री मुद्रा योजना महिला कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे उदघाटन आमदार संजय पुराम हे करतील. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे हया असतील. प्रमुख अतिथी म्हणून महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीमती लता दोनोडे, पं.स.सभापती श्रीमती अर्चना राऊत, उपसभापती दिलीप वाघमारे, सालेकसा नगराध्यक्ष विरेंद्र उईके, जि.प.सदस्य मोहन टेकाम, श्रीमती दुर्गा तिराले, देवराज वडगाये, पं.स.सदस्य श्रीमती जया डोये, श्रीमती प्रमिला दसारिया, हिरालाल फाफनवाडे, श्रीमती राजकुमारी विश्वकर्मा, श्रीमती प्रतिभा परिहार, भरत लिल्हारे, तहसिलदार प्रशांत सांगळे व गटविकास अधिकारी ए.एल.खाडे उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा अग्रणी प्रबंधक दिलीप सिल्लारे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक निरज जागरे, सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सविता बेदरकर, महिला आयोगाच्या जिल्हा समन्वयक रजनी रामटेके व जिल्हा उद्योग केंद्राचे प्रभारी व्यवस्थापक बी.एम.शिवणकर उपस्थित राहणार आहेत. तरी या मेळाव्यास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे यांनी केले आहे.