वनहक्क पट्टयांची प्रकरणे तातडीने निकाली काढा- पालकमंत्री

0
13

गोंदिया,दि.२६ : मागील काही वर्षापासून वनहक्क जमिनीच्या पट्टयांची प्रकरणे प्रलंबीत आहे. संबंधित लाभार्थ्यांना या वनहक्क पट्टयांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रलंबीत प्रकरणे तातडीने निकाली काढा,असे निर्देश पालकमंत्री यांनी दिले.२५ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात वनहक्क पट्टे प्रकरणांचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी आमदार संजय पुराम, जि.प.उपाध्यक्ष अलताफ हमीद, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, निवासी उपजिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांची प्रमुख्याने उपस्थिती होती.
श्री.बडोले यावेळी म्हणाले, लोकांजवळ शेती नाही. त्यामुळे वनहक्क पट्टयांची जूने दावे निकाली काढण्यासाठी उपविभागीय स्तरावर शिबिरे घेवून प्रलंबीत प्रकरणे लवकराव लवकर निकाली काढण्यात यावे. उपविभागीय स्तरावर १७६३४ प्राप्त दावे असून अर्जुनी/मोरगाव- ४३९२, तिरोडा- ३०२, देवरी- ३८० व गोंदिया- निरंक, असे एकूण ५०७४ दावे प्रलंबीत आहेत. अनेक वर्षापासून लाभार्थी वनहक्क पट्टयांच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे वनहक्क पट्टयांची प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी प्रशासनाने वैयक्तीक लक्ष्य दयावे असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेअंतर्गत जिल्ह्याला १ लाख २० हजार ६३३ उद्दिष्ट दिले आहे. या उद्दिष्ट पूर्ततेसाठी प्रत्येक तालुका स्तरावर शिबीरे घेण्यात यावी. यासाठी गॅस एजन्सीधारकाने सहकार्य करावे. येत्या सहा महिन्यात सर्व पात्र लाभार्थ्यांना उज्ज्वला गॅस कनेक्शन देण्यात यावे. तसेच सर्व गॅस वितरक एजन्सीपुढे प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सबसिडीबाबत बॅनर लावण्यात यावे असे निर्देश त्यांनी यावेळी संबंधित यंत्रणेला दिले. यावेळी त्यांनी गॅस एजन्सीधारकांच्या समस्या जाणून घेतल्या.
बैठकीला गोंदिया उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, तिरोडा उपविभागीय अधिकारी जी.एम.तळपाडे, अर्जुनी/मोरगावच्या उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाळे, देवरीचे प्रभारी उपविभागीय अधिकारी साहेबराव राठोड तसेच सर्व गॅस वितरक एजन्सीधारक व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.