शासनाची विकास कामे जनतेपर्यंत पोहोचवा-ना. बडोले

0
14

भाजप कार्यकर्ता मेळावा व सत्कार समारोह
गोरेगाव, २५ फेब्रुवारी : राज्यातील प्रत्येक क्षेत्रातील भौगोलिक परिस्थितीनुरूप शेतकरी, शेतमजूर व बेरोजगारांच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासन विविध योजना राबवित आहे. जिल्ह्यात विविध विकासात्मक काम सुरू असून अनेक कामे शासनाच्या विचाराधीन आहेत. त्यामुळे येत्या काळात शेतकèयाचा qसचनासह शेतीपुरक उद्योगातून साधला जाईल. सोबत बेरोजगार व बचत गटाच्या विकासासाठी विविध प्रकल्प राबविले जाणार आहेत. ही विकास कामे जनतेपर्यंत पोहोचावित यासाठी पक्षाच्या कार्यकत्र्यांनी जनतेपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यातूनच पक्ष व शासनाप्रती जनतेचा विश्वास वाढणार आहे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
तालुक्यातील सोनी जि. प. क्षेत्राच्या सदस्या सीताबाई रहांगडाले यांच्या वतीने आयोजित भाजप कार्यकर्ता मेळावा तसेच नवनिर्वाचित आमदार व खासदार यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. भाजप जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली माजी आ. हेमंत पटले यांनी सोहळ्याचे उद्घाटन केले. यावेळी ना. राजकुमार बडोले, खा. नाना पटोले, आ. विजय रहांगडाले यांचा जि. प. सदस्य सीताबाई रहांगडाले यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देउन सत्कार करण्यात आला. सोहळ्याला माजी. आ. खुशाल बोपचे, खोमेश रहांगडाले, रेखलाल टेंभरे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष दिलीप चौधरी, रविकांत बोपचे, सभापती चित्रकला चौधरी, तालुकाध्यक्ष डॉ. लक्ष्मण भगत, युवराज रहांगडाले, संजय बारेवार, रूषीपाल टेंभरे, शशीबाई फुंडे, पंकज रहांगडाले, सुरेश रहांगडाले, नितीन कटरे प्रामुख्याने उपस्थित होते.
सीताबाई रहांगडाले यांनी, सोनी क्षेत्रातील विविध विकास कामाचा आढावा मांडून शेतकरी, शेतमजुर व बेरोजगारांच्या समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी निवेदन पुस्तिका सादर केली. अध्यक्षीय भाषण करतांना विनोद अग्रवाल यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतांना, कार्यकर्ते व पदाधिकाèयांनी विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन केले.
खा. नाना पटोले यांनी, कार्यकत्र्यांना सर्तक व जागरूक राहण्याचा सल्ला देवून राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनेतंर्गत प्रकल्प आणून क्षेत्राचा विकास साधला जात आहे. आगामी काळात सर्वसामान्यांना नक्कीच चांगले दिवस येतील, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी आ. विजय रहांगडाले, माजी आ. हेमंत पटले, खोमेश रहांगडाले यांनीही समयोचित मार्गदर्शन केले. संचालन तालुका उपाध्यक्ष कमलेश रहांगडाले यांनी केले तर आभार युवराज रहांगडाले यांनी मानले.