सुरक्षा गार्ड रामटेके विरुध्द मुलींच्या तक्रारीवर गुन्हा दाखल

0
18

मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहाच्या गृहपालाकडून दडपशाहीचा प्रयत्न
गोंदिया : येथील मागासवर्गीय मुलीच्या शासकीय वसतिगृहातील सुरक्षा गार्डतर्फे वसतीगृहातील मुलीची छेड काढण्याचे प्रकरण बाहेर आल्यानंतर व या प्रकरणी मंगळवारी रात्री उशीरा गोंदिया शहर पोलिसांनी सुरक्षा गार्ड शाबास रामटेके यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शासकीय वसतिगृहाच्या कार्यभार काढुन घेण्यात आलेल्या गृहपाल सुजाता रामटेके यांनी रात्रीच्या वेळी वसतिगृहातील विद्यार्थीनींना तुम्हाला कोर्टात जावे लागेल. पोलिस स्टेशनमध्ये जावे लागेल अशी भिती दाखवून तक्रार मागे घेण्यासाठी दबाब घातल्यामुळे वसतीगृहातील विद्यार्र्थीनी संपूर्ण रात्र दहशतीखाली रडून काढल्याची तक्रार आज वसतिगृहातील विद्यार्थीनींनी व मानवाधिकार संघटनेच्या महिला अध्यक्षा धर्मिष्ठा सेंगर यांनी प्रभारी विशेष समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम यांच्याकडे नोंदविल्याने या प्रकरणाला परत वेगळे वळण लागले आहे.
सध्या परिक्षेचे दिवस असून गृहपाल सुजाता रामटेके सुड भावनेने धाक दाखवित असल्याने विद्यार्थीनींच्या मानसिकतेवर प्रतिवूफ्ल प्रभाव पडत असल्याने कार्यभार काढण्यात आलेल्या सुजाता रामटेके यांना शासकीय वसतीगृहातील निवासातुन बाहेर काढण्यात यावे व अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आलेल्या गृहपाल बबिता हुमणे यांना २४ तास वसतिगृहात ठेवण्यात यावे अशी मागणी विद्यार्थीनींनी केली आहे.
सोमवारी सदर प्रकरण उघडकीस आल्यानंतर प्रभारी विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम यांनी या प्रकरणासंदर्भात गृहपाल सुजाता रामटेके हिला कारणे दाखवा नोटीस दिली तसेच त्यांच्याकडील कार्यभार मुर्री येथील निवासी शाळेच्या मुख्याध्यापिका बबिता हुमणे यांच्याकडे दिला. तसेच सुरक्षा गार्ड शाबास रामटेके याला कमी करण्याच्या सुचना संबंधित एजेन्सीला केली. मंगळवारी बबीता हुमणे यांना अतिरिक्त कार्यभाराचे आदेश देण्यात आले.
मात्र, वसतीगृहातील शासकीय निवासस्थानी सुजाता रामटेके राहत असल्याने बबीता हुमणे रात्री त्या ठिकाणी थांबल्या नाहीत व ही संधी साधून सुजाता रामटेके यांनी रात्री मुलींना बोलावून त्यांना कोर्ट व पोलिसाचा धाक दाखवून तुमचे नुकसान होईल अशी भिती दाखविल्याने वसतिगृहातील मुलींनी रडायला सुरवात केली. काही विद्यार्थीनीची १२ वीची परिक्षा सुरू आहे. त्यांनाही या गोंधळामुळे अभ्यास करता आला नाही. त्यामुळे वसतिगृहात राहणाèया व शिक्षण घेणाèया सुमारे ८० विद्यार्र्थीनीचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आहे. असे म्हटले तरी, वावगे ठरणार नाही.
दरम्यान रात्री स्वाती बसोने या विद्यार्थीनीची या गोंधळामुळे प्रकृती खराब झाली. तिला रूग्णालयात दाखल करण्यासाठी विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम यांना मध्यरात्री उठून रूग्णालयात पाठविण्याची सोय करावी लागली.
मानवाधिकार संघटनेच्या अध्यक्षा धर्मिष्ठा सेंगर यांनी सुजाता रामटेके यांच्याकडून कार्यभार काढून घेतल्याने वसतिगृहाच्या व्यवहारात हस्तक्षेप करण्याचा त्यांना कुठलाही अधिकार नाही तसेच विद्यार्थीनींवर दबाव टाकण्याचे काम चुकीचे आहे. ही बाब सुरेश पेंदाम यांच्या लक्षात आणून दिली. सुरेश पेंदाम यांची या प्रकरणी योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.