खा.नेतेंनी घेतला पिकविम्याचा आढावा

0
11

चंद्रपूर,दि.05ः-शेतकऱ्यांच्या विविध अडचणी व कर्जमाफी ,पिकविमा व अन्य विषयाला घेऊन गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी आज( दि.5) चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात सबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेत माहिती जाणून घेतली.तसेच पिकविमा,कर्जमाफीसंबधीचे निर्णय त्वरीत घेत शेतकर्यांना लाभ देण्याच्या सुचना केल्या.
या बैठकीला खासदार अशोक नेते, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे,जि.प. उपाध्यक्ष कृष्णाजी सहारे, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, भाजप नागभीड तालुकाध्यक्ष होमदेव मेश्राम, तुकाराम पाटिल टिकरे व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नागभीड़, सावली, सिंदेवाही, मुल तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले.यावेळी सर्व शेतकरी व नागरिकांच्या अडचणी तात्काळ सोडविण्याच्या सूचना खासदार नेते यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.