गोंदियाला झोडपले पावसाने,जलमय रस्त्यावरुन विद्यार्थ्यांची शाळेकडे धाव

0
9

गोंदिया,दि.16ः- गेल्या काही दिवसांपासून रिमझीम स्वरुपात येणार्या पावसाने रविवारच्या रात्रीपासून गोंदिया जिल्ह्यात चांगली हजेरी लावल्याने 4 तालुक्यात अतिवृष्ठी झाली आहे.सोबतच गोंदिया शहरातील रेलटोली परिसरातील रस्ते जलमय झाले आहेत.रतनारा 176 मिमी,रावणवाडी 102.60 मिमी,गोंदिया 165 मिमी.,गंगाझरी 120 मीमी असे गोंदिया तालुक्याता 103.38 मिमी पावसाची नोंद,गोरेगाव 145.3 मीमी,कुर्हाडी 155.40 मीमी,मोहाडी 82.20 मीमी,गोरेगाव तालुका 127.63 मीमी अतिवृष्टी झाली.तिरोडा तालुक्यात परसवाडा 122 मीमी,तिरोडा 107 मीमी,वडेगाव 139.20 मीमी,दांडेगाव 72.10 मीमी तिरोडा तालुक्यात 99.06 मीमी अतिवृष्टी,आमगाव तालुक्यात कट्टीपार 131.20 मीमी,आमगाव 75.80 मीमी,तिगाव 74.05 मीमी.ठाणा 86.20 मीमी नोंद झाली आहे.जिल्ह्यात 68.45 मीमी पावसाची नोंद आज करण्यात आली आहे.

तर आजपर्यंत 443.68 मीमी नोंद झाली आहे.या अतिवृष्टीमुळे अनेक शिक्षकासंह कर्मचार्यांना आपल्या घरातून बाहेर पडता आलेले नाही.त्यामुळे प्रशासनाने काहीतरी निर्णय घेण्याची गरज होती.त्यातच पावसाचा जोर अद्यापही कायम असल्याने कुठलीही हानी होऊ नये याची काळजी घेत शाळांना तसे निर्देशही द्यायला हवे होते.परंतु अद्यापही तशी कुठलीच प्रकिया प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेली नाही.नाल्यातील पाण्याच्या उपसा करण्यासाठी नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाला कामी लावण्यात आले होते.गोरेगाव तालुक्यातील पिंडकेपार येथेही जोरदार पावसामुळे रेल्वेचा अंडरग्राऊंड पुलाखाली पाणी साचल्याने वाहतुक बंद पडली आहे.

वृत्तलिहिपर्यंत त्या रस्त्यावरुन वाहणारे व घरातील पाणी कमी झालेले नव्हते.त्यातच जोरदार आलेल्या पावसामुळे रस्त्यासह लोकाच्या घरातही पाणी शिरल्याने चांगलीच ताराबंळ उडाली आहे.पुनाटोली,कन्हारटोली,गजानन काॅलनी,शिवनगर,चौरागडे मेडीकल चौक,कुडवा नाका,राजाभोज काॅलनी आदी परिसरातील रस्ते पाण्याखाली आले आहेत.सकाळी 10 वाजेपर्यंत त्या रस्त्यावरील पाणी कमी झालेले नव्हते.त्यातच चौरागडे मेडीकल चौकात तर 3 फुटाच्यावर पाणी जमा झाले होते.सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास एक व्यक्ती रेल्वेस्थानकाकडे जात असताना त्यांचा तोल सुटल्याने ते पाण्यात पडल्याने वाहून जात असताना तिथे असलेल्यानी धावून गेल्याने त्यांना वाचविण्यात आले.अन्यथा सदर व्यक्ती या पावसाचा बळी ठरला असता.याभागातील नाले ओव्हरफ्लो झाल्याने रस्त्यावर पाणी साचले.नदीनाल्यांना आलेल्या पुराने लगतच्या वस्त्यांमध्ये व घरांमध्येही पाणी शिरले आहे. नाल्यांच्या सफाईअभावी पावसाचे बरसलेले पाणी तुंबले व बहुतांश शहराला तलावाचे स्वरूप आले.शहरात अतिवृष्टी झाल्यानंतर रस्त्यावर पाणी साचलेले असतानाही गोंदिया शहरातील शिक्षणाचा व्यवसाय करणार्या शाळांना भरपावसात मुलांना घेण्यासाठी बसेस पाठविल्या.आटोचालकांनी पाण्यातून आटो नेत मुलांना नेण्याची घाई करतानाचे चित्र दिसले.यावर जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांच्याशी संपर्क करुन त्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न भ्रमणध्वनीवर करण्यात आला.मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांनी याप्रकरणाची माहिती देण्यात आली.तेव्हा आपण पाणी साचलेल्या भागातच असल्याचे सांगत पाण्यातून विद्यार्थ्यांना नेण्याचे चुक असल्याचे कबुल केले.परंतु प्रशासनाने मात्र काहीही पाऊल उचलले नाही.