ग्रीन रिफायनरी विदर्भात आणणार

0
9

नागपूर,दि.21ः- नाणार रिफायनरी प्रकल्पाला कोकणवासीयांचा विरोध असल्यामुळे हा प्रकल्प विदर्भात आणावा अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली होती. आता मुख्यमंत्री यांनी केंद्रिय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जाऊन विदर्भात ग्रीन रिफायनरी आणण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती सभागृहाला दिली असल्याचे आ. आशीष देशमुख यांनी विधान भवन परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
युती सरकारमध्ये असलेल्या शिवसेनेचा नाणार प्रकल्पाला विरोध असल्यामुळे हा प्रकल्प विदर्भात आणावा, त्यामुळे विदर्भाचा विकास होईल असे मत आशिष देशमुख यांनी व्यक्त केले. सभागृहात मुख्यमंत्र्यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे जाऊन हा प्रकल्प मंजूर करुन घेतील असा विश्‍वास ही आ. देशमुख यांनी व्यक्त केला.