बेेरोजगारांचा अशोक लेलँडवर मोर्चा

0
12

साकोली,दि.26 : जिल्ह्यातील युवा बेरोजगारांना गडेगाव येथील अशोक लेलँड कारखान्यात रोजगार उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी भंडारा जिल्हा भारतीय युवा रोजगार संघटनातर्फे येत्या २८ जुलै रोजी लाखनी बसस्टँड ते गडेगाव येथील अशोक लेलँड कारखान्यापर्यंत पैदल मोर्चा काढण्यात येईल, अशी माहिती डॉ. अजय तुमसरे व अविनाश ब्राह्मणकर यांनी पत्र परिषदेत दिली.यावेळी डॉ. तुमसरे यांनी जिल्ह्यात एका नोंदणीनुसार सुमारे ८१ हजार बेरोजगार युवा तरूण असून अशोक लेलॅंडसह २७ औद्योगिक संस्थाने जिल्ह्यात आहेत. मात्र या संस्थानामध्ये जिल्ह्यातील स्थानिक बेरोजगारांना काम उपलब्ध करून दिले जात नाही. जिल्ह्याबाहेरील लोकांना कामावर लावण्यात आले आहे. स्थानिक तरुणाजवळ कौशल्य असूनही त्याला काम मिळत नसल्यामुळे त्यांच्यात आक्रोश व्याप्त आहे. जिल्ह्यातील या तरुणांना रोजगार मिळावा या मागणीसाठी हा पैदल मार्च असल्याचे ते म्हणाले. या मोर्चरचे नेतृत्व शेतकरी संकटमोचन संघटनेचे डॉ. अजय तुमसरे, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष अविनाश ब्राम्हणकर करणार असून यावेळी खासदार मधुकर कुकडे, नाना पंचबुद्धे, राजेंद्र जैन, सेवक वाघाये, सुनील फुंडे, जि.प. अध्यक्ष रमेश डोंगरे, नंदू समरीत, डॉ. ब्रम्हानंद करंजेकर सहभागी होणार आहेत..