डव्वा येथे केरोसीनचा काळाबाजार

0
20

गोरेगाव,दि.01ः-तालुक्यातील डव्वा येथील केरोसीन वितरक कन्हैयालाल कुकरेजा यांच्या दुकानातून गावातील नागरिकांनी पुरेशा केरोसीनची मागणी केल्यावरही न देता बाहेरच्यांना अधिक दरात केरोसीनची विक्री करुन गावातील गरीब,दारिद्रयरेषेखालील जनतेची पिळवणूक करण्याचा प्रकार घडत असल्याची तक्रार नागरिकांनी गोरेगावचे तहसिलदार अरविंद हिंगे यांच्याकडे केली आहे.
गावातील प्रतिष्ठित एका नागरीकाने दिलेल्या माहिती केरोसीन विक्रेता कुकरेजा हे ४० ते ४५ रुपये प्रति लीटर दराने केरोसीनचे अवैध विक्री करतात.तर गावातील गरजूनी जर केरोसीनची मागणी केली तर त्यांना उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करतात.काही गोंदिया निवासी व्यक्ती या केरोसीन दुकानातून कॅनमध्ये भरुन केरोसीन नेत असल्याचेही नागरिकांचे म्हणने आहे.यासंबधीची तक्रार तहसिलदारांना करण्यात आली आहे.मंगळवारला जेव्हा या दुकानातील केरोसीनची पाहणी काही नागरिकांनी केली असता दुकानात फक्त अंदाजे ४० ते ५० लीटर केरोसीनचा साठा उपलब्ध होता मात्र फलकावर ११६ लीटरचा आकडा लिहून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचेही गणेश तुरकर यांनी म्हटले आहे.