अंनिस व समविचारी संघटनेचे ‘जवाब दो’ आंदोलन

0
9
गोंदिया,दि.20: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर व कॉ. गोविंद पानसरे यांच्या मारेकरूला अजूनपर्यंत अटक न झाल्याने गोंदिया उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सोमवार, २० आॅगस्ट रोजी अंनिस व समविचारी संघटनेने धरणे देऊन ‘जवाब दो’ आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे निवेदन देण्यात आले.
महाराष्ट अंधश्रद्धा निर्मूलन समिती गोंदियाद्वारे २० आॅगस्ट रोजी जिल्हाध्यक्ष माणिक गेडाम यांच्या नेतृत्वात रमाकांत खोब्रागडे, कार्याध्यक्ष विनोद बन्सोड,डॉ. माधोराव कोटांगले,सचिव डॉ. सविता बेदरकर, युवा कार्यवाह अ‍ॅड. अमित उके यांचे मार्गदर्शनात ‘जवाब दो’ आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अर्ध्व्यु डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या निर्घृण हत्येला ५ वर्षे उलटूनही तसेच जेष्ठ कामगार नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्याही हत्येला साडे तीन वर्षे पुर्ण झाले असलेतरी अजूनपर्यंत केंद्र व राज्य शासनातर्फे या दोघांच्याही हत्येकर्यांची रेखाचित्र प्रसिद्ध करूनही अजूनपर्यंत अटक न झाल्याने कुठेतरी शासन या कार्यास प्रवृत्त करणारे सुत्रधार सनाथन संस्था व हिंदू जनजागरण समितीच्या साधकांचा आरोप व पत्रात सहभाग असल्याची स्पष्टपणे नमूद करण्यात आले असले तरी शासनाचे अक्ष: दिरंगाई व राजकीय इच्छाशक्तीच्या अभाव जाणवत असून तसेच खुनाच्या तपासात समोर आलेल्या साक्षी पुराव्यांच्या बळकटीसाठी आवश्यक ठोस पुरावे व फरार गुन्हेगारांना अटक करण्यात तपास यंत्रणांना अपयश आले असून या परिस्थितीत फरार मारेकºयांच्या विरोधात अंतरराष्ट्रीय रेड कॉर्नर नोटीस तपास यंत्रणांकडून यांच्यावर बक्षीस आणि छायाचित्र जाहीर करूनही याचा काही उपयोग झाला नसून राज्यात अल्पसंख्यांक, दलित, मागासवर्गीय महिला व बालिका यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात असहिष्णूततेचे देशभरात वर्तन होत असून जनसामान्यमध्ये भयग्रस्त वातावरण निर्माण करणारे तसेच भारतीय संविधानाला धक्का पोहोचवून संवैधानिक व्यवस्था मोडकळीस आणण्याचा डाव असल्याचा संशय व्यक्त होत असून या सर्वांचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व समविचारीन पक्ष संघटनांतर्फे विरोध दर्शविण्यात येत असून याबाबत शासनाने खुलासा करावा व डॉ. नरेंद्र दाभोळकर व कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येकºयांना त्वरित अटक करावी, असे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. याप्रसंगी माणिक गेडाम, रमाकांत खोब्रागडे, विनोद बन्सोड, डॉ. माधव कोटांगले, प्रा. सविता बेदरकर, अ‍ॅड. अमित उके, कॉ. मिलिंद गणवीर, अनिल गोंडाणे, मनोज बोरकर, नरेश चव्हाण, सुरेश सोनवाने, पल्लवी रामटेके, डी.टी. कावळे आदी उपस्थित होते.