सत्तेवर येताच सरकार शेतकर्यांना विसरली-अग्रवाल

0
7

गोंदिया,दि.26 : लोकसभा निवडणुकीला घेऊन भाजप सरकारने धानाला २०० रूपयांची वाढ दिली. सत्तेवर येण्यापूर्वी भाजपाकडून नेहमीच धानाला तीन हजार रूपये क्विंटल भाव देण्याची मागणी केली जात होती. मात्र स्वत:चे सरकार आल्यानंतर त्यांना याचा विसर पडला आहे. जिल्ह्यातील काही नेत्यांनी १३ हजार ५०० ते १८ हजार रूपयांची एकरी भरपाई दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देण्याची पोस्टरबाजी केली. मात्र शेतकºयांनी केवळ एक हजार ते पंधराशे रूपयांची भरपाई देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सरकार करीत असल्याचे आमदार गोपालदास अग्रवाल म्हणाले.
तालुक्यातील ग्राम जब्बारटोला येथे गॅस कनेक्श वाटप कार्यक्रमांतर्गत आमदार अग्रवाल यांच्या हस्ते ग्राम जब्बारटोला येथील २१ लाभार्थ्याना गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. तर सोबतच सहा लाख रूपयांच्या निधीतून मंजूर दुर्गा मंदिरातील सभामंडप व गावातील अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानावरून बोलताना पंचायत समिती सभपती माधुरी हरिणखेडे यांनी, भाजप सरकारने मोठ मोठ्या योजनांची घोषणा केली. मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी केली नाही. घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना दोन वर्षांपासून अनुदान मिळाले नसून कित्येकांच्या घरांचे बांधकाम बंद पडले आहे. गोंदिया तालुक्यात सुमारे सहा हजार लाभार्थी असून त्यांच्या घरांचे काम अडकले असल्याचे त्यांनी सांगीतले.
याप्रसंगी जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले, लता दोनोडे, चमन बिसेन, प्रकाश डहाट, रमेश लिल्हारे, बंडू शेंडे, वत्सला चिखलोंडे, सेवक चिखलोंडे, निलिमा शहारे, दयावंती सोनवाने, मिनाक्षी वैद्य, सुप्रिया उंदीरमारे, वनमाला शहारे, महेश रहांगडाले, भय्यालाल चिखलोंडे, थामनलाल लिल्हारे, भेजेंद्र जैतवार यांच्यासह मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते.