प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदियातर्पेâ जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील सात समाजसेवकांचा सत्कार

0
11
गोंदिया,दि.27 : प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदियाच्या वतीने दरवर्षी १ सप्टेंबरला स्थापना दिन सोहळा आयोजित करण्यात येतो. यानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणार्‍या ७ समाजसेवींचा सत्कार केला जातो. यावर्षी समाजसेवा पुरस्कारासाठी डॉ.देबाशिष चॅटर्जी, साहित्य रत्न पुरस्कारासाठी डॉ.सौ.उषाकिरण आत्राम, कृषीरत्न पुरस्कारासाठी सौ.मंदाताई गावडकर व देवेंद्र राऊत (संयुक्त), कर्तव्यनिष्ठ प्रशासकीय सेवेसाठी डॉ.विजय वानखेडे व शिक्षकरत्न पुरस्कारासाठी विनोद गहाणे त्याचप्रमाणे जीवन गौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ पत्रकार रमेशचंद्र दुबे यांची निवड करण्यात आली आहे. एका हॉटेलमध्ये निवड झालेल्या सर्व सत्कारमुर्तींचा सत्कार करण्यात येणार आहे.
प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदियाचा स्थापना दिन व सत्कार सोहळा १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता ग्रॅण्ड सिता हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात उद्घाटक म्हणून राज्याचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री इंजि.राजकुमार बडोले, अध्यक्षस्थानी ट्रस्टचे अध्यक्ष अपूर्व मेठी, तर विशेष अतिथी म्हणून जि.प.अध्यक्ष सौ.सिमाताई मडावी, माजी खासदार नानाभाऊ पटोले हे उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार गोपालदास अग्रवाल, गोंदियाचे नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाधिकारी डॉ.सौ.कांदबरी बलकवडे, अदानी प्रकल्पाचे प्रमुख चैतन्य साहू, माजी जि.प.उपाध्यक्ष विनोद अग्रवाल उपस्थित राहणार आहेत. यानिमित्त स्व.रंजितभाई जसानी स्मृति समाजसेवा पुरस्काराने डॉ.देबाशिष चॅटर्जी, स्व.रामदेव जायस्वाल स्मृति साहित्यरत्न पुरस्काराने सौ.डॉ.उषाकिरण आत्राम, स्व.फाल्गुणराव पटोले स्मृति कृषी रत्न पुरस्काराने सौ.मंदाताई गावडकर, देवेंद्र राऊत, स्व.रामकिशोर कटकवार स्मृति कर्तव्यनिष्ठ पुरस्काराने डॉ.विजय वानखेडे तर स्व.मोहनलाल चांडक स्मृति आदर्श शिक्षक पुरस्काराने शिक्षक विनोद गहाणे यांचा स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र व शाल, श्रीफळ देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदियाच्या वतीने करण्यात आले आहे.