स्पर्धा परीक्षा व रोजगार विषयक मार्गदर्शन शिबिरात गुणवंत विद्याथ्र्यांचा सत्कार

0
14

सडक अर्जुनी,दि.२८ः- सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र राज्य तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान नागपूर यांच्या वतीने रोजगार विषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन तेजस्विनी लॉन, सडक अर्जुनी येथे करण्यात आले होते. या शिबिरात तज्ञ मार्गदर्शकाकडून स्पर्धा परीक्षा व रोजगारासंदर्भात मार्गदर्शन व गुणवंत विद्याथ्र्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला विद्याथ्र्यांचा प्रतिसाद मिळाला.
रोजगार शिबिराचे उद्घाटन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिप सभापती विश्वजित डोंगरे, अर्जुनी मोर पंस सभापती अरविंद शिवनकर, सडक अर्जूनी पंस सभापती गिरधर हत्तीमारे, बाजार समिती अर्जुनी मोरचे उपसभापती लायकराम भेंडारकर, माजी सभापती उमाकांत ढेंगे, प्रकाश गहाणे तसेच इतरही पदाधिकारी उपस्थित होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून धनंजय वंजारी, निलेश रोहितकर, हेमंत सुटे, अश्विन कापसे, संदिप बडोले, विनय मानकर आदि तज्ज्ञ प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील दहावी व बारावीमध्ये गुणवत्ता प्राप्त विद्याथ्र्यांचा पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि राष्ट्राचे संविधान देऊन सत्कार करण्यात आला. तज्ञ मार्गदर्शकांनी इयत्ता बारावी, पदवी नंतर काय? यावर मार्गदर्शन करुन स्पर्धा परीक्षा, पायलट, एअर होस्टेस, केबिन क्रू, ग्राऊंड स्टाफ आदी प्रशिक्षण मार्गदर्शन, एम. फील, पी. एचडी फेलोशिप मार्गदर्शन, उद्योजकता विकास, समाज कल्याण विभागाच्या विविध योजना, देश-विदेशातील उच्च शिक्षण, जात पडताळणी, शिष्यवृत्ती आदिंवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक व नागरिक उपस्थित होते.