नगरविकास आघाडीतर्फे विविध मुद्यावर मुख्याधिकारीसह पदाधिकारीसोबत चर्चा

0
9

सालेकसा,दि.३०ः- सालेकसा नगरपंचायत क्षेत्रात समाविष्ठ झालेल्या आमगाव खुर्द गावातील समस्याबाबंत नगर विकास आघाडीतर्फे आज गुरुवारला सालेकसा नगरपंचायतचे मुख्याधिकारी तसेच उपाध्यक्ष प्रल्हाद वाढई,बांधकाम सभापती उमेदलाल जैतवार यांच्या उपस्थीतीत निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.यामध्ये शासनाच्या ८ ऑगस्टच्या शासन आदेशाप्रमाणे आमगाव खुर्द ग्रामपंचायतीचा सालेकसा नगरपंचायतीमध्ये समावेश झालेला आहे.पण शासकीय निधी जुन्या ग्रामपंचायतमधील लोकसंख्येला धरुनच मिळत असल्याने नव्याने समाविष्ठ झालेल्या आमगाव खुर्द येथील समस्या सोडविण्यासोबतच विकास कसा करण्यात येणार यावर नगरविकास आघाडीच्यावतीने चर्चा करण्यात आली.त्यासोबतच शासनाने २०१५ च्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला डावलून १३ ऑक्टोबंर १७ ला निवडणुक घेतले त्यानुसार निवडलेले पदाधिकारी सध्या काम बघत आहेत.परंतु ८ ऑगस्ट १८ च्या शासन आदेशाप्रमाणे आमगाव खुर्दचा समावेश सालेकसा नगरपंचायतमध्ये झाल्याने हद्दवाढ झाली आहे.जुन्या नगरपंचायत क्षेत्रात लोकप्रतिनिधी काम बघत आहेत तर आमगाव खुर्द भागात प्रशासक काम बघत असल्याने ही बाब कायद्याच्या चौकटीत बसणारी नाही.एकाच नगरपंचायत क्षेत्रातील ३५ टक्के लोकनियुक्त तर ६५ जागेवर शासन प्रशासक कसे काय नेमू शकतो असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.तसेच अशी तरतूद कुठल्या कायद्यात आहे याची विचारणा नगरविकास आघाडीतर्फे बबलू कटरे यांनी केली.यावेळी मनोज डोये,कुलतारqसह भाटिया,शैलेष बहेकार,रqवद्र चुटे,विजय फुंडे,सुनिल असाटी,मुरलीधर कावडे,श्री चौरे,दिलीप तिवारी व इतर गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.