शकुन-अपशकुन ही मनाची विकृती-हरीश देशमुख

0
17

ब्रम्हपुरी,दि.10ः- आजही लोकांची मानसिकता अजूनही बदललेली नाही. शकुन-अपशकुन ही मनाची विकृती आहे. खंडाळा येथील युगचा दिलेला बळी हा नरबळीचा प्रकार असून याबाबतीत आणखी खोलात जाऊन प्रबोधन करण्याची गरज आहे. विज्ञानाच्या कसोटीला हे सारे तपासून मुळापयर्ंत जाण्याची गरज आहे कारण अंधर्शध्देपोटी धनप्राप्तीसाठी दिलेला नरबळी हा सर्व मनाचा खेळ आहे, असे प्रतिपादन समितिचे महासचिव हरीश देशमुख यांनी केले.
अखिल भारतीय अंधर्शद्धा निर्मूलन समिती, शाखा ब्रह्मपुरीच्यावतीने येथील विठ्ठल रुक्मिणी सभागृहात लोकनेते बाबूरावजी भेंडारकर स्मृतिदिनानिमित्त ह्यनरबळी : त्यामागील अंधर्शध्दा व मानसशास्त्र विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला.सुरुवातीला बाबूरावजी भेंडारकर आणि युग मेर्शामला भावपूर्ण र्शध्दांजली वाहण्यात आली.
विचारपीठावर अध्यक्षस्थानी अँड. गोविंदराव भेंडारकर होते. मार्गदर्शक म्हणून पूर्व विदर्भ संघटक हरिभाऊ पाथोडे, सदस्य सुरेश झुरमुरे, जिल्हा संघटक अनिल दहागावकर, संघटीका छायाताई सावरकर,प्रा. विजय मुडे उपस्थित होते. याशिवाय शाखेचे अध्यक्ष डॉ, खिजेंद्र गेडाम, डॉ. मनिषा बनवाडे, प्रा. बालाजी दमकोंडवार, सुजित खोजरे इ. मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी हरिभाऊ पाथोडे म्हणाले की, नरबळी संदर्भात लोकांची मानसिकता बदलविणे आवश्यक आहे.युगचा दिलेला नरबळी हा निंदनीय प्रकार असून कु. पुनम खांडरे, डॉ मुरके आणि आता युग मेर्शाम इ. दिल्या गेलेल्या नरबळी प्रकरणाची माहिती सांगून आज आणखी सजग होण्याची गरज आहे. यावेळी अनेक वक्तयांची मार्गदर्शनपर भाषणे झालीत.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. आकाश मेश्राम यांनी तर प्रास्ताविक प्रा बालाजी दमकोंडवार,आभार डॉ शशिकांत बांबोळेनी मानले. यशस्वीतेसाठी डॉ. योगेश बनवाडे, प्रा. मिलिंद पठाडे, अभिजित कोसे, गोपाल करंबे, कु घुग्गूसकर इ. पर्शिम घेतले. कार्यक्रमाला चोले गुरुजी, प्रा.नामदेवराव जेंगठे, प्रा शेखर बन्नोरे, प्रा वानस्कर, अनिल लोनबले, प्रा. डॉ. धनराज खानोरकर, प्रा. अनिल कोडापे, डॉ. राजू आदे, यशवंत कायरकर,अरुण लाखे इ. अनेक मान्यवर उपस्थित होते.