व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ‘गोंदिया मंथन’

0
10
या गृपचे वैशिष्ट्य असे की, यात जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, लोप्रतिनिधी, अधिकारी, सामजिक कार्यक्रते, पत्रकार, डॉक्टर, व्यापारी मान्यवर या गृपचे सदस्य आहेत.
व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून शहरात जे उल्लेखनीय सामाजिक कार्य केले गेले याचा आढावा या कार्यक्रमात घेतला गेला. शिवाय शहरातील समस्यांचाही यावेळी उहापोह करण्यात आला. या समस्यांचे निराकरण या कार्यमाच्या माध्यमातून व्हावे, यासाठी हे एक चांगले व्यासपीठ आहे. उपस्थितांनी शहरातील समस्या आणि उपाय गोंदिया मंथनच्या पॉम्पलेटवर लिहून दिल्या. तर मान्यवरांच्या हस्ते प्रथम तीन चिठ्ठ्या काढून त्यावर लवकरात लवकर तोडगा काढू, असे आश्वासन उपस्थित मान्यवरांनी गृपच्या सदस्यांना दिले.
यावेळी कार्यक्रमाला पोलीस अधिक्षक हरिष बैजल, नगर परिषदेचे अध्यक्ष अशोक इंगळे यांनी या कार्यक्रमात सहभाग घेत गोंदिया मंथन या कार्यक्रमाची प्रशंसा केली. गोंदिया शहरातील समस्या सोडवण्यासाठी हा उपक्रम नक्कीच मार्गदर्शक ठरेल, असा आशावाद या वेळी इंगळे यांनी व्यक्त केला.  शिवाय शहरात दूषित पाण्याची समस्याही लवकरच दूर करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
 गृपच्या माध्यमातून देहदान, नेत्रदान यासारख्या विधायक गोष्टींसाठी  पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आल्याने हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे उद्गार जिल्हा पोलीस अधीक्षक हरीश बैजल यांनी काढले. तसेच या गृपच्या माध्यमातून जाती- धर्माच्या पलीकडे जाऊन जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन गृपच्या मान्यवर सदस्यांनी दिले.