तालुका कृषी विभागाच्या योजनांतही राजकारण-किशोर तरोणे

0
16

नवेगावबांध,दि.03 : भारत हा कृषी प्रधान देश असून शेतकऱ्यांचा आर्थिक व सामाजिक विकास व्हावा, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्या याकरिता शासन विविध योजना कृषी विभागाच्या माध्यमाने राबवत असते. परंतु अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कृषी अधिकारी हे सदर योजनांचा लाभ भाजपा कार्यकर्त्यांनाच देत असल्याचा आरोप जि.प. सदस्य किशोर तरोणे यांनी केला आहे. .

शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना ह्या तालुका स्तरावर राबविल्या जातात. त्या मागे शासनाचा उद्देश हा असतो की, शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे व आत्महत्यापासून वंचित राहावे. परंतु अर्जुनी मोरगाव तालुक्यात हे चित्र अगदी वेगळे आहे. येथील तालुका कृषी अधिकारी हे शेतकरी या शब्दाचा अर्थ भाजपा कार्यकर्ता असा लाऊन फक्त भाजपाचा कार्यकर्ता असेल अशाच शेतकऱ्याला जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या माध्यमाने शासकीय योजनांचा लाभ खऱ्या लाभाथ्र्याला न देता पक्षीय राजकारणात फक्त भाजपा कार्यकर्त्यांनाच देत असल्याचे लक्षात आहे. जैविक शेती अंतर्गत झालेला कृषी पर्यटनाचा विदेश दौऱ्यामधील लाभार्थी हे पूर्णत: भाजपाचेच असल्याचे लक्षात आले. ९५ टक्के सुटीवर देण्यात आलेले ट्रॅक्टर चलीत धान मळणी यंत्र हेही बचत गटांना न देता भाजपा कार्यकर्त्यांनाच देण्यात आले. स्वयंचलित मळणीयंत्र ५५ टक्के सुटीवर देण्यात आलेले ही योजनाही भाजपा कार्यकर्त्यांनाच देण्यात आली. ट्रॅक्टर खरेदीच्या लाभार्थी यादीवर नजर फिरविली असता यामध्येही ९० टक्के लाभ हा पक्षीय द्वेषातून भाजपा कार्यकर्त्यांनाच देण्यात आला. शेती सुधारणा, कोल्ड स्टोरेज हाऊस शेतकरी कंपन्यांना देण्यात येणारे राईस मिल, मिनी राईस मिल, शेती उपयोगी विविध औजारे अशा विविध योजनांचा लाभ हेतुपुरस्सर तालुका कृषी अधिकाऱ्याने खऱ्या लाभार्थींना न देता फक्त पक्षीय राजकारण करून सत्ताधारी पक्षांच्या कार्यकर्त्यांनाच दिल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर बाबींची चौकशी करून सत्यता पळताळून तालुका कृषी अधिकाऱ्याच्या राजकीय वर्तवणुकीला आळा घालून कार्यवाही करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष व जि.प. सदस्य किशोर तरोणे यांनी केली आहे. .